अहो रामराजे तुम्ही डबल टिबल श्रीमंत लावा आम्हाला काहीही देणंघेणं नाही मगएमआयडीसी ज्यांनी जमिनी दिल्या, ग्रामदैवत मोडले यात्रा मोडली अन स्थानिक मुले का पर्मनंट करीत नाही याचे उत्तर द्या
फलटण प्रतिनिधि -
सुरवडी मधून अनेकांना हदरे बसलेत, त्यांचा राजकीय उन्माद संपला,त्यांची मस्ती जिरवली आहे,शरद पवारांच्या छताडावर बसून बारामती कडे रेल्वे नेली, यांनी फक्त बारामती करांची चाटायचं काम केले आहे असा घणाघात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अगदीच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच थेट नाव घेत अक्षरशः तुटून पडत साखरवाडी कारखाना कवडीमोल किंमतीला खरेदी करीत त्यातून राजकीय अड्डे धारू चालवतोय पण लक्षात ठेव जर यापुढे सुधारणार झाली नाही तर तुझ्या मागचं लागावे लागेल, सुरवडी एम आय डीसी ला जमिनी आमच्या अन कामगार पुण्याचे गाड्या बारामतीच्या अन कामगार कोण तर रामराजें ची मुलगी अन लीगल ऍडव्हाईजर मुलगा असे सांगत अक्षरशः राजेगटाची चिरफाड केली.
वाठार निंबाळकर गटाचा व सुरवडी गणाचा प्रचाराचा शुभारंभ सुरवडी येथे झाला तेव्हा ते बोलत होते यावेळी आमदार सचिन पाटील, जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, फलटण तालुका संघर्ष समितीचे अड. नरसिंह निकम,जेष्ठ नेते नगरसेवक अशोकराव जाधव,माजी पंचायत समितीच्या उपसभापती सौ. विमलताई साळुंखे पाटील,जिल्हा परिषद उमेदवार विष्णू लोखंडे,सुरवडी पंचायत समितीचे उमेदवार धनंजय साळुंखे पाटील,वाठार निंबाळकर गण उमेदवार सौ. शुभांगी ताई तुकाराम शिंदे,तुकाराम शिंदे, शरयू जितेंद्र साळुंखे पाटील,राजेंद्र काकडे,सुरेश सापते यांच्यासह भाजप चे पदाधिकारी तसेच वाठार निंबाळकर गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की जमिनी सुरवडी, नांदल,ढवळेवाडी,निंभोरे भागातील दिल्या देवस्थान बुडविली यात्रा जत्रा बुडाल्या, मात्र नोकरीला पर्मनंट पुण्याचे लोक आमच्या मुलांना कॉन्ट्रॅक्ट बेस हे काय चाललंय आता फलटण तालुक्यातील जनतेने तुम्हाला चांगल ओळखले आहे आता फलटण तालुक्यात चांगले हायवे रस्ते, विकासाचा ओघ सुरु आहे,वाठार निंबाळकर गट हे भूकंपाचे केंद्र आहे रामराजे आता प्रल्हादराव पाटलांचा नाद करायचा नाही असा सज्जड दम भरीत चौफेर टीका केली.
तुम्ही राजकारणात अनेकांना संपविण्याचा प्रयत्न केला अनेकांच्या घरात हात तुम्ही घातला की घर पडते हात भाजतो,आता तुमच्यावर ती वेळ आली आहे, आमचे आमदार सचिन पाटील लोकांच्यात मिसळतात, जन माणसात जातात, अधिकारी घेऊन गावागावत जातात, तुम्ही व तुमच्या आमदारांनी पंधरा वर्षे मातीत घालविली, तुमचे आमदार रिमोट कंट्रोल होते, तुम्ही वाघोशी वरून पाणी आणू शकला नाही, उभ्या पिकात मशीनरी घालून एम आयडीसीला जमिनी दिल्या,परंतु ते लोक एमआयडीसी अधिकाऱ्यांना काहीही काम सांगू शकत नाहीत, इथल्या मुलांना तिथं काम लागत, लागलं की ते कधीही काढून टाकतात, तिथं कामाला मुले पुण्याची, गाड्या बारामती च्या तुम्हाला सर्व सत्ता अन सगळं दिलं पण हातात त्या शेतकऱ्यांच्या हातात धतुरा आला, तिथं श्रीमंत रामराजेच्या मुलीला नोकरी मुलगा लीगल ऍडव्हायझर अरे हे काय तुम्ही स्वतःला श्रीमंत समजता अन नोकऱ्या तुम्हाला घेता अशी टीका केली.
अहो रामराजे तुम्ही डबल टिबल श्रीमंत लावा आम्हाला काहीही देणंघेणं नाही मगएमआयडीसी ज्यांनी जमिनी दिल्या, ग्रामदैवत मोडले यात्रा मोडली अन स्थानिक मुले का पर्मनंट करीत नाही याचे उत्तर द्या,तुम्ही फलटण तालुक्याची इज्जत गहाण ठेवली लोणंदला,शेतकऱ्यांची जमिनी काढून घेत कॉन्ट्रॅक्ट वरची मुलं इथली अन पर्मनंट मुलं बाहेरची तिथल्या जमिनीवर जव्हेरी ची नावे टाकली, आता ही निवडणूक झाली की ते नावं मी काढून टाकणार असल्याचे रणजितसिंह यांनी जाहीर केले.
अहो रामराजे आम्ही बारामतीकरांकडे लाचारी नाही केली शरद पवारांच्या छतडावर पाय ठेऊन रेल्वे नेली, माझा मुलगा नगराध्यक्ष झाला पाहिजे भाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष झाला पाहिजे ही तुमची राजकारणाची पद्धत आहे.साखरवाडी कारखाना 200 कोटीची मालमत्ता असलेला तुम्ही फक्त 65 कोटीत घेतला,तो धारू कंपनी कंपनीच्या पद्धतीने चालवा राजकारण केल तर गाठ माझ्याशी आहे तुम्हाला पळता भुई करेन, तुम्ही शेतकऱ्यांना पैसे दिलेत असे दाखवले,बोगस कागदपत्रे केली त्यात रामराजे होते असे स्पष्ट केले असा गौप्यस्फोट केला तासगावकर कारखाना उभा राहिला असता तर पूर्व भागात शेतकऱ्यांना फायदा झाला असता परंतु तुम्ही होऊ दिला नाही असे रणजितसिंह यांनी सांगितले.
नीरा देवधर चा शब्द मी पाळला,नाईकबोमवाडी एमआयडीसी मध्ये दोन कंपनी येताय,त्यामुळे आठ जिल्हा परिषद गट व सोळा पंचायत समिती निवडून आणणार असल्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले यावेळी मिरगावं येथील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरवडी गणाचे उमेदवार धनंजय साळुंखे पाटील यांनी केले तर आभार जितेंद्र साळुंखे पाटील यांनी मानले यावेळी सुरवडी तसेच आसपासच्या पंचक्रोशीतील मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











