Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

'उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे'

देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार
टीम : धैर्य टाईम्स
'Uddhav Thackeray should take off the mask of motherhood'
'शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्दच पाळायचा होता तर सुभाष देसाई, दिवाकर रावते एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं होतं. मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं? राणेंना तर पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं. राज ठाकरेंना पक्षातून बाहेर का जावं लागलं?' असा सवाल करतानाच 'उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे', अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.

मुंबई : 'शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्दच पाळायचा होता तर सुभाष देसाई, दिवाकर रावते एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं होतं. मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं? राणेंना तर पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं. राज ठाकरेंना पक्षातून बाहेर का जावं लागलं?' असा सवाल करतानाच 'उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे', अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्यांवरुन जोरदार टोलाही लगावला होता. मी एका जबाबदारीने मुख्यमंत्रिपद स्वीकारलं आहे. केवळ वडिलांना दिलेल्या वचनामुळे हे पद मला स्वीकारावं लागलं आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असे वचन मी बाळासाहेबांना दिले होते. त्यानुसार भाजपने शब्द पाळला असता व शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असता तर कदाचित आज मी राजकीय जीवनातून बाजूलाही झालो असतो, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे.
'उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे. मुख्यमंत्री बनण्याची त्यांची महत्त्वकांक्षा होती ती त्यांनी पूर्ण केली. राजकारणात महत्त्वकांक्षा असणं गैर नाही. पण त्याला तत्वज्ञानाची जोड देणं कितपत योग्य आहे?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तुमची महत्त्वकांक्षा ती तुम्ही पूर्ण केली त्यामुळे दोष देणं थांबवा. आता दोन वर्ष झाले आहेत. किती दिवस तेच तेच बोलणार,' असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
'शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विचाराचं सोनं लुटलं जायचं. पण काल त्यांना गरळ ओकताना पाहिलं. जनतेने भाजपला नाकारलं नाही. काँग्रसे राष्ट्रवादीला नाकारलं. शिवसेनेला वरपास केलं याचं त्यांना विस्मरण झालं आहे. आम्ही ७० टक्के जागा जिंकल्या. तुम्ही ४५ टक्के जागा जिंकल्या. तुम्हाला जनतेने नाकारलं. तुम्ही बेईमानी करुन सत्तेवर आलात हे बेईमानीने तयार झालेलं सरकार आहे,' अशा शब्दांत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल केला आहे.
'मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे. बंगाल करायचाय म्हणजे काय करायचंय? यूनियनबाजी आणि खंडणीने बंगालमध्ये एकही उद्योग टिकला नाही. कोलकाताची आजची व्यवस्था काय आहे हे माहीत आहे का? आणि तुम्हाला बंगाल करायचाय म्हणजे जो तुमच्या विरोधात बोलेल त्याचं मुंडकं छाटून त्याला फासावर लटकावयाचं आहे अशा प्रकारचा महाराष्ट्र घडवणार आहे का? जोपर्यंत आमच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. जोपर्यंत भाजप जिवंत आहे. तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. काय वाटेल ते करू पण महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही,' असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
'मुख्यमंत्र्यांनी संघराज्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही पद्धत बदलली पाहिजे म्हणजे काय?, आंबेडकरांचे संविधान बदलण्याचे मनसुबे त्यांनी बोलून दाखवले. काहीही हे मनसुबे आणि छुपा अंजेडा काही डाव्या विचारांच्या पक्षांना सोबत घेऊन रचताय पण काहीही झालं तरी तो कधीच पूर्ण होऊ देणार नाही,' असा इशाराही त्यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER