Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधून योजनांचा लाभ घ्यावा

न्यायमूर्ती मिलींद जाधव :  कोरेगाव येथे विधी सेवा व शासकीय योजनांचे महाशिबीर संपन्न
टीम : धैर्य टाईम्स
Take advantage of the scheme by contacting the District Legal Services Authority
न्याय हा सर्वांसाठी असून न्याय फक्त न्यायालयात मिळत नाही तर न्यायालयाच्या बाहेरसुध्दा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो. तरी गरजवंतांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधून योजनांची माहिती घेऊन जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सातारा पालक न्यायमूर्ती मिलींद जाधव यांनी केले.

सातारा :  न्याय हा सर्वांसाठी असून न्याय फक्त न्यायालयात मिळत नाही तर न्यायालयाच्या बाहेरसुध्दा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो. तरी गरजवंतांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधून योजनांची माहिती घेऊन जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सातारा पालक न्यायमूर्ती मिलींद जाधव यांनी केले.
कोरेगाव येथील गजरा मंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा व शासकीय योजना महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या महाशिबिराचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलींद जाधव यांचे हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र  न्यायाधीश मंगला धोटे, पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तृप्ती जाधव, ॲङ.सुखदेव पाटील, ॲड.अशोककुमार वाघ, ॲड.वसंतराव भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जाधव म्हणाले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत विधी सेवा देण्याचे काम सुरु असून यातून गरजूंना न्याय मिळत आहे. यामुळे वेळ आणि पैशाची बचत होत आहे. त्याचबरोबर लोक न्यायालय व लोकअदालत याही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सातारा न्यायालयाचा विधी जागर पथनाट्याचा कार्यक्रम खूप चांगला असून या पथनाट्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत देण्यात येणाऱ्या विविध लाभांची माहिती सहजपणे समजते. हा पथनाट्याचा कार्यक्रम प्रत्येक गावी करा. यासाठी जे करावे लागेल ते केले जाईल, असे आश्वासनही जाधव यांनी यावेळी दिले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे म्हणाल्या, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात दि.2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2021 या दरम्यान कायदेविषयक शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये महिलांविषयी असणाऱ्या कायद्यांची माहिती देण्यात आली. तसेच जुलै महिन्यामध्ये पाटण, वाई व महाबळेश्वर या तालुक्यांमध्ये भूस्खलन झाले होते तेथील नागरिकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मदत करण्यात आली. सध्या न्यायालयाकडून न्याय आपल्या दारी ही योजना राबवित आहे. या योजनेचाही जिल्ह्यातील नागरिकांना लाभ झाला आहे. तसेच कोरेगाव येथे जिल्हा विधी सेवा योजनांचे महाशिबिर भरविण्यात आले आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी पोलीस अधिक्षक बन्सल म्हणाले, महिलांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यात महिला पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 3 प्रशिक्षणाचे वर्ग झाले अहेत. या प्रकल्पांतर्गत शाळेतील महाविद्यालयातील मुलींना त्यांच्याविषयी असलेल्या कायद्यांची माहिती देण्यात येत आहे. तसेच त्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शिंदे म्हणाले, शासनाचा प्रत्येक विभाग त्यांच्याकडील असलेल्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहे. संगणकीकृत सातबाऱ्याचे काम 99 टक्के पूर्ण झाले असून हे काम अचूक करण्याचा प्रयत्न महसूल विभागाने केले आहे. ग्रामीण भागात गरजूंना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचा मोबदला थेट लाभार्थींच्या खात्यावर जमा होत आहे. कोविड संसर्ग परिस्थितीत अनेक लोकांना मदत करण्यात आली असून जिल्ह्यात आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या शिक्षणासाठी दत्तक पालक योजना राबवित असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात दि. 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विविध गावांमध्ये शिबीरांचे आयोजन करुन सर्वसामान्य नागरिकांना कायदेविषयक माहिती दिली. तसेच कोविड काळात बाहेर राज्यातील लोकांना बाहेर राज्यात जाण्यासाठी नागरिकांना मदत केली. तसेच भूस्खलन झालेल्या गावातील नागरिकांना कायदेविषयक सर्व मदत करण्यात आले, असल्याचे  प्रास्ताविकात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी सांगितले.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील न्यायाधीश, वकील विविध विभागांचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार दिवाणी न्यायाधीश गिरीष माने यांनी मानले.
शासकीय स्टॉल ठरले नागरिकांचे आकर्षण महसूल, पंचायत समिती, पोलीस विभाग, कृषी विभाग, महिला व बाल कल्याण, आरोग्य विभाग, पोस्ट विभाग, समाजकल्याण यासह विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलवर नागरिकांनी गर्दी करुन आपल्या संबंधित असलेल्या योजनांची माहिती करुन घेतली. स्टॉलवर उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडील असलेल्या योजनांची माहिती नागरिकांना सविस्तर दिली.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER