धैर्य टाईम्स | दहिवडी |
दहिवडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै. पुण्यनगरीचे श्री. उमेश बुधावले यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी दैनिक प्रभात चे प्रतिनिधी श्री. प्रवीण राजे यांची निवड करण्यात आली.
दहिवडी पत्रकार संघ हा सर्व दैनिकांचे तालुका प्रतिनिधी असणारा संघ आहे. मागील दोन वर्षांमध्ये उमेश बुधावले यांनी पत्रकारांच्या सर्व अडचणी चांगल्या पद्धतीने सोडविल्यामुळे त्यांच्यावर सर्वच पत्रकारांनी तिसऱ्यांदा विश्वास टाकत बिनविरोध अध्यक्षपदी विराजमान केले.तर उपाध्यक्षपदी प्रवीण राजे यांना प्रथमच संधी मिळाली आहे. तर सचिव पदी बापूसाहेब मिसाळ, प्रसिद्धीप्रमुख माणदेश प्राईमचे संपादक सचिन शिंगाडे व खजिनदार नवनाथ भिसे यांची निवड झाली.
दहिवडी पत्रकार संघाचे संस्थापक लालासाहेब दडस यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी येथील शासकीय विश्रामगृह येथे निवडी पार पडल्या यावेळी दै. सकाळचे प्रतिनिधी रुपेश कदम, दै. लोकमतचे प्रतिनिधी नवनाथ जगदाळे, दै. पुढारीचे प्रतिनिधी विशाल माने,दै. नवराष्ट्रचे दौलत नाईक, माणदेश माझाचे संपादक लिंगराज साखरे, दै. पुण्यनगरीचे अभिजित अवघडे व विजय जगदाळे आदी सदस्य उपस्थित होते.