महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागीय एसटी कार्यालयासमोर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. मात्र, हा संप सूरु असताना वाहक राजेंद्र बाबूराव पवार (वय ५३, रा. १७२, यादोगोपाळ पेठ, सातारा) हे कर्तव्यावर हजर झाले.
सातारा : एसटी संप चालू असताना कर्तव्यावर हजर झाले म्हणून वाहकास मारहाण करण्याची घटना सातारा विभागीय एसटी कार्यालयाच्या समोर घडली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला असून रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आले नव्हते. विक्रम जंगम असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागीय एसटी कार्यालयासमोर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. मात्र, हा संप सूरु असताना वाहक राजेंद्र बाबूराव पवार (वय ५३, रा. १७२, यादोगोपाळ पेठ, सातारा) हे कर्तव्यावर हजर झाले. त्यामुळे त्यांना विक्रम अशोक जंगम (रा. मांडवे, ता. सातारा) याने गालावर चापट मारली. तसेच पुन्हा कर्तव्यावर हजर होवू नये म्हणून, दमदाटी केली. तसेच सरकारी कामात अडथळा आणला. या घटनेनंतर राजेंद्र पवार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दिली असून याप्रकरणी विक्रम जंगम याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक फौजदार जगदाळे करत आहेत.