फलटण प्रतिनिधी:- नवामळा ठाकुरकी येथील एक जणांने खाजगी सावकाराकडून घेतलेल्या पैशाप्रकरणी व झालेल्या शिवीगाळ दमदाटी प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात खाजगी सावकार व त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १० रोजी दुपारी १२ ते दिनांक ११ रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान वेळोवेळी नवामळा ठाकुरकी ता. फलटण येथे फिर्यादी संतोष किसन शिंदे (रा. नवामळा ठाकुरकी ता. फलटण जि. सातारा) यांना हार्वेस्टिंग मशीनची दुरुस्ती व मजुरांचे पगार करतात पैशाची आवश्यकता असल्याने फिर्यादी यांनी शामराव शंकर निंबाळकर (रा. अलगुडेवाडी ता. फलटण) यांच्याकडून मासिक १० टक्के व्याजाने १ लाख ८५ हजार रुपये एवढी रक्कम घेऊन त्याचे मोबदल्यात फिर्यादी व फिर्यादी यांची पत्नीचे नाव असणारे पत्रावजा घर अकरा महिन्यांचे लिव्ह अँड लायसन्स करार करून ६ लाख रुपये डिपॉझिट स्वीकारून दर महिना दोन हजार रुपये लायसन्स फी अशी नोटरी करून घेतली. व्याजाचे रकमेच्या मोबदल्यात वेळोवेळी २ लाख ४५ हजार रुपये देऊन देखील व्याज व मुद्दल आणखी ६ लाख द्यावे लागतील याकरिता वारंवार तगादा लावून शामराव व त्याची पत्नी नाव माहित नाही यांनी घरी येऊन फिर्यादी शिवीगाळ दमदाटी केली तसेच फिर्यादी यांनी सदर बाबत पोलीस ठाणे येथे तक्रार अर्ज दिल्यानंतर फिर्यादीकडून घेतलेल्या चेक वरती व्याज मुद्दलाची ६ लाख रुपये अशी रक्कम टाकून चेक बॉन्स करून घेतला. याबाबत फिर्यादी आणि त्यांना विचारले असता फिर्यादी यांना शिवीगाळ करून दमदाटी केली म्हणून फिर्यादी यांनी शामराव शंकर निंबाळकर व त्याची पत्नी यांच्याविरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.