फलटण प्रतिनीधी:-माढा लोकसभा मतदार संघातील मतदान है दिनांक सात मे रोजी असून सदर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून फलटण ग्रामीण पोलिसांनी केले 23 जणांना तात्पुरते तडीपार केले आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक आचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या आदेशांप्रमाणे फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी जिल्ह्यामध्ये ज्यांच्या विरुद्ध दोनपेक्षा जास्त मालमत्ता विरुद्ध शरीराविरुद्धचे गुन्हे अवैधपणे दारू विक्री गुन्हे मटका जुगार गुन्हे आहेत अशा लोकांना तात्पुरत्या स्वरूपात दिनांक ५/५/२०२४ ते ७/५/२०२४ दरम्यान तडीपार करावे असा याबाबतचा अहवाल फौजदारी प्रक्रिया संहिता 144 प्रमाणे उपविभागीय अधिकारी फलटण सचिन ढोले यांच्याकडे पाठविण्यात आला होता.
उपविभागीय अधिकारी फलटण सचिन ढोले यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 प्रमाणे साजन पवन भोसले (राहणार सांगवी), गोकुळ बापू मदने (राहणार नऊ सर्कल फरतरवाडी),शाहूराज विठ्ठल जगताप (राहणार साखरवाडी),गणेश संपत खलाटे (राहणार खुंटे), अक्षय विजय चव्हाण (राहणार साठे फाटा), देविदास अभिमान काळे (राहणार साखरवाडी),महेंद्र नारायण निकाळजे (राहणार विडणी ),विशाल बापू वाडकर (राहणार सुरवडी ), धनंजय नंदू करचे (राहणार तालुका फलटण), आर्यन शंकर कांबळे (राहणार सांगवी शाहूनगर), रोहित उर्फ भैय्या प्रकाश लोंढे (राहणार सांगवी),गणेश श्रीमंत माने (राहणार सांगवी शाहू नगर), प्रकाश गुलाब मोरे (राहणार भाडळी बुद्रुक),मनोहर धनंजय जाधव (राहणार साखरवाडी), रामदास विनायक मंडले (राहणार शाहूनगर सांगवी),ज्ञानेश्वर बापू चव्हाण (राहणार शेरे शिंदेवाडी), रामचंद्र दशरथ लोंढे (राहणार बरड), सुनील संजय आढाव (राहणार गुणवरे), नागेश दीपक कुराडकर (राहणार गुणवरे), श्रेयस उत्तम नाळे (राहणार दुधेभावी), अमित विठ्ठल उभे (राहणार धुमाळवाडी), अशोक बापूराव चव्हाण (राहणार खटके वस्ती), रोहित तानाजी शिंदे (राहणार पिंपळद) या 23 लोकांना तात्पुरत्या स्वरूपात दोन दिवसासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहे.
आणखीन गुन्हेगाराना तडपीपार प्रक्रिया सुरु आहे. तसेच या पूर्वी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56,55 व 57 प्रमाणे सुद्धा सहा गुन्हेगार तडीपार असून काही लोकांचे आदेश प्राप्त होणार आहेत सदर आरोपी मिळून आलेस त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली आहे.