Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

हनीट्रॅप मध्ये अडकवून चार लाखाची खंडणी मागणाऱ्या टोळीस ग्रामीण पोलिसांनी केली अटक

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनीधी -

 फलटण शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याचे अपहरण करत मारहाण करून त्याच्याकडुन ४ लाख रुपये खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणा-या एका महिलेसह सहाजणांची टोळीला फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सजल विलास दोशी (वय ३७ वर्ष, व्यवसाय हॉटेल, रा. न्यु भारत साडी सेंटरसमोर, रविवार पेठ, ता. फलटण, जि. सातारा) यांनी दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली होती ज्यामध्ये फिर्यादी यांचे फलटण शहरांमध्ये 'हॉटेल चॉईस' या नावाने हॉटेल आहे. मागील चार महिन्यापासून त्यांच्या हॉटेलमध्ये एक महिला अधून मधून जेवणाचे पार्सल नेण्यासाठी येत होती. त्या महिलेचा मोबाईल क्रमांक फिर्यादी यांच्याकडे होता.ती महिला तिचे नाव 'माया' असे ते सांगत होती. 

संशयित आरोपी महिला व फिर्यादी यांची ओळख झाल्यानंतर दि. ३० ऑगस्ट २०२४ यातील तक्रारदार यांच्यासोबत ती फिरायला जाण्यासाठी तयार झाली. फिर्यादी यांनी संशयित आरोपी महिलेला दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी सुरवडी येथून मोटरसायकलवर घेतले. त्यानंतर त्यांनी लोणंद, वीरधरण या ठिकाणी फेरफटका मारल्यानंतर एक सुरक्षित लॉज शोधत होते. परंतु त्यांना सुरक्षित लॉज न मिळाल्याने ते परत येत असताना त्यांना काळज-बडेखान जवळ दोन जणांनी अडवून "आमच्या बहिणीला घेऊन कुठे घेऊन फिरता" असे म्हणून फिर्यादी सजल विलास दोशी यास मारहाण करत रस्त्याच्या बाजूला घेऊन गेले. त्यावेळेस महिला ही त्या ठिकाणावरून निघून गेली. त्यानंतर फिर्यादी सजल विलास दोशी यांना मारहाण करून रात्री अकरा वाजेपर्यंत तिघा जणांनी हे त्याच्यावर बलात्काराची केस दाखल करणार आहेत अशी धमकी देत होते. फिर्यादी सजल विलास दोशी

यांच्याकडून बळजबरीने त्यांनी फोन पे द्वारे २६ हजार रुपये घेतले व फिर्यादी यांना उद्या आणखी ४ लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले नाही आला तर फिर्यादी सजल विलास दोशी याचे नग्न काढलेले व बलात्कार केल्याबाबत वदवून घेतेलेल व्हीडोओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

फलटण ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपी महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता फलटण शहरांमधील रेकॉर्डवरील १) उमेश संजय खोमणे (वय २८ वर्ष, रा. खराडेवाडी, ता. फलटण, जि. सातारा),२) गणेश बाळु मदने (वय १९ वर्ष, रा. पाचसर्कल, खामगाव, ता. फलटण, जि. सातारा), ३) कुमार उर्फ बोक्या लक्ष्मण शिंदे (वय २८ वर्ष, रा. भाडळी खुर्द, ता. फलटण, जि. सातारा),४) जयराज उर्फ स्वागत आनंदराव चव्हाण (वय २६ वर्ष, रा. झिरपवाडी, ता. फलटण, जि. सातारा),५) आकाश काशिनाथ डांगे (वय ३० वर्ष, रा. भाडळी बु, ता. फलटण, जि. सातारा) ६) माया (टोपण नाव) वय ३० वर्ष ७) अनिल गजरे (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांना अटक करण्यात आले असून हे गुन्हेगार महिलेच्या मदतीने फिर्यादी सजल विलास दोशी यास लुटत होते व काही लोक हे मोबाईलद्वारे इतर आरोपींच्या संपर्कात राहून आरोपीला हनीट्रॅपमध्ये अडकून सुव्यवस्थितपणे कट करून फिर्यादी कडून पैसे काढत होते. सदर प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने हे करीत आहेत. 

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर व उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल महाडीक यांचे नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, शिवाजी जायपत्रे, पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने, मच्छिंद्र पाटील, पोलिस अमंलदार नितीन चतुरे, वैभव सूर्यवंशी, श्रीनाथ कदम, संदीप मदने, अमोल जगदाळे, श्रीकांत खरात, हनुमंत दडस, रशिदा पठाण यांनी सदरची कारवाई केली. 

या टोळीने फलटण व लोणंद या भागात सुद्धा अनेक लोकांना यापूर्वी हनीट्रॅपमध्ये अडकवलेले असण्याची शक्यता आहे. अशा लोकांनी आपल्या संबंधित पोलिस ठाण्यात किंवा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क करावा.

सुनिल महाडीक

पोलिस निरीक्षकफ,लटण ग्रामीण पोलिस ठाणे

आकाश काशिनाथ डांगे यांच्या विरोधात यापूर्वी अनेक ठिकाणी सैन्य भरती प्रकरणी फसवणुकीचे गुन्हे दाखल असून सैन्य भरती फसवणुक सोबत हनीट्रॅप प्रकरणी आकाश काशिनाथ डांगे याचा सहभाग उघड झाला आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER