66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त फलटण येथे आयोजित केलेल्या भीम गीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्रातील ज्येष्ठ गायिका कडूबाई खरात, ओ सेठ तुम्ही नादच केलाय थेट फेम उमेश गवळी यांच्या गीतांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. कार्यक्रमाचा शुभारंभ विधान परिषदेचे मा. सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार दीपक चव्हाण, फलटण तालुका दूध पुरवठा संघाचे माजी चेअरमन भीमदेव बुरुंगले, जाधववाडीचा सरपंच श्रीमती गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चांडाळ चौकडी च्या करामती या युट्युब वरील विनोदी मालिकेतील प्रमुख कलाकार यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी आंबेडकरी चळवळीतील योगदान देणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी योगदान दिले. कार्यक्रमाचे आयोजन मा.नगरसेवक सनी अहिवळे यांनी केले. सूत्रसंचालन आनंद पवार सर यांनी केले तर आभार सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ सुपर्णाताई अहिवळे यांनी मानले.