फलटण प्रतिनीधी:- उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सचिन ढोले यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56(1) (अ) (ब) अन्वये दोन जणांना सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचेकडील पत्र दि. 08/09/2023 अन्वये शेखर शरद खताळ, (वय 30 वर्षे, रा. कापडगांव, ता. फलटण, जि. सातारा) यांच्याविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1) (अ) (ब) अन्वये पुढील कायदेशीर प्रक्रिया चालविण्यासाठी या कार्यालयास हद्दपार प्रस्ताव प्राप्त झाला होता. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांचेकडील दि. 21/10/2023 चौकशी अहवालानुसार शेखर शरद खताळ यास हद्दपार करणेबाबत सुनावणी प्रक्रिया पार पडून उपविभागीय अधिकारी फलटण यांचेकडील दिनांक 05/01/2024 चे आदेशान्वये फलटण व वाई उपविभाग हद्दीतून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1) (अ) (ब) अन्वये शेखर शरद खताळ यांना पुढील सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचा आदेश दिले आहेत.
तसेच अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचेकडील पत्र दि. 31/08/2021 अन्वये अक्षय बाळकृष्ण माने (वय 22 वर्षे, रा. शिवाजीनगर वाचनालय जवळ शंकर मार्केट फलटण, ता. फलटण, जि. सातारा) यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56(1) (अ) (ब) अन्वये पुढील कायदेशीर प्रक्रिया चालविण्यासाठी हद्दपार प्रस्ताव प्राप्त झाला असता उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांचेकडील दि. 10/07/2023 चौकशी अहवालानुसार अक्षय बाळकृष्ण माने (वय 22 वर्षे, रा. शिवाजीनगर वाचनालय जवळ शंकर मार्केट फलटण, ता. फलटण, जि. सातारा) यास हद्दपार करणेबाबत सुनावणी प्रक्रिया पार पडून उपविभागीय अधिकारी फलटण यांचेकडील दिनांक 08/01/2024 चे आदेशान्वये सातारा जिल्ह्याचे हद्दीतून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56(1) (अ) (ब) अन्वये अक्षय बाळकृष्ण माने यास पुढील सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचा आदेश दिले आहेत.