फलटण दि. ७ एप्रिल
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य वसंत कृष्णा शेडगे, उपप्राचार्य (माध्यमिक) ए. वाय. ननावरे, उपप्राचार्य (ज्युनिअर विभाग) सोमनाथ माने, पर्यवेक्षक रवींद्र नाळे, सौ. पूजा पाटील, आर. बी. निंबाळकर, तसेच एचओडी सौ. एच. यू. बुचडे, सौ. हेमलता कदम, सौ. कांचन शिंदे (शालेय आरोग्य विभाग प्रमुख) तर रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या वतीने माजी प्राचार्या श्रीमती शाहीन शेख, संचालिका डॉ. सायली बगाडे, सौ. रझिया शेख, सचिव मारुती टकले आणि इमरान सय्यद उपस्थित होते.
यावेळी सौ. शाहीन शेख यांनी विद्यार्थ्यांना संस्कार व आरोग्याचे महत्त्व पटवून दिले, तर डॉ. सायली बगाडे यांनी मोबाईलच्या अति वापरामुळे होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनीही या मार्गदर्शनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका कु. तृप्ती विलास शिंदे यांनी केले. कार्यक्रमास ज्युनिअर व माध्यमिक विभागातील शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.










