Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

फलटण पालिकेसाठी 70 टक्के मतदान वाढलेले मतदान बदलणार निकाल ?

भाजपा की शिवसेना नगराध्यक्ष कोण होणार याचा फैसला उद्या
टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी -


फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी चांगलीच रांग लावली होती यामध्ये किरकोळ बाचापाची वगळता तसेच प्रभाग क्रमांक 13 मध्ये मतदान यंत्रावर बटन दाबले जात नसल्याने तब्बल तीन ते चार उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही मशीन बदलण्यासाठी अधिकाऱ्यांनी निरुत्साह दाखवल्याने अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. 

    

फलटण नगरपालिका निवडणूक 2 डिसेंबर ऐवजी आज शनिवार दिनांक 20 डिसेंबर रोजी मतदान पार पडले 45514 पैकी 31990(पुरुष 15859 स्त्री 16129 व इतर 2) मतदारांनी मतदान केले,या झालेल्या मतदानाची 70.29 टक्केवारी झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांनी दिली,ही मतमोजणी 13 टेबलावर 5 फेऱ्या होणार आहे दरम्यान ही मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणाला तारक तर कोणाला मारक ठरणार हे उद्या रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारपर्यंत स्पष्ट होईल. 


   फलटण नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर तसेच शिवसेनेचे उमेदवार श्रीमंत अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात तुल्यबळ लढत पाहायला मिळाली यामुळे कोण कोणाला चितपट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. फलटण शहरातील सर्वच मतदान केंद्रावर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यामध्ये प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक चार या ठिकाणी काही उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये किरकोळ बाचाबाची झाली त्याचबरोबर एका महिला मतदाराला पोलिसांनी लाठी हल्ला केल्याची चर्चा होत होती यामुळे अगोदरच फलटण नगरपालिकेची निवडणूक ही फार मोठी अटीतटीची आणि हातगाहीची होती यामुळे फलटण शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

    

 फलटण नगरपालिकेमध्ये थेट नगराध्यक्ष पद व 27 नगरसेवक यांचे राजकीय भवितव्य आज मतदान यंत्रामध्ये बंद झाले असून उद्या सकाळी दहा वाजता निकालाला सुरुवात होईल 13 टेबल वरती ही मतमोजणी होणार असून या मतमोजणीची संपूर्ण तयारी करण्यात आली असून उद्या रविवार दिनांक 21 रोजी निकालानंतर तब्बल नऊ वर्षानंतर फलटण पालिकेला नगराध्यक्ष तसेच नगरसेवक मिळणार असून भाजपा व शिवसेनेमध्ये झालेली तगडी लढत संपूर्ण सातारा जिल्ह्यात गाजली असून भाजपा की शिवसेना सत्तेत बसणार याची उत्कंठा फलटणमध्ये शिगेला पोहोचले आहे.

    

दरम्यान फलटण कोरेगाव चे विद्यमान आमदार सचिन पाटील तसेच भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर अन् नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर या तिघांनी प्रभाग क्रमांक 13 मध्ये आपले मतदानाचा हक्क बजावला त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दोन तीन आणि चार या ठिकाणी साडेपाच वाजून गेल्यानंतरही मतदार मोठ्या संख्येने आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भल्या मोठ्या रांगेमध्ये उभे होते.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER