Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

इतर सहा जणांना सह आरोपी करा - सुषमा अंधारे

टीम : धैर्य टाईम्स

इतर सहा जणांना सह आरोपी करा - सुषमा अंधारे


फलटण प्रतिनिधी -जयकुमार गोरे कोण तीस मार खान? गोरेंनी आणि चाकणकरांनी आधी स्वतःच चारित्र्य बघावं असा हल्लाबोल सुषमा अंधारें यांनी केला तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर आल्या तेव्हा मागे पुढे करणारे एस पी तुषार दोशींचेही वाभाडे काढले यावेळी फलटण शहर,फलटण ग्रामीण व लोणंद पोलिस ठाण्यातील सगळा सावळागोंधळ बाहेर काढीत अक्षरशः पोलिसांवर तुटून पडल्या अन् इतर सहा जणांना सहआरोपी करण्याची मागणी सुषमा ताई अंधारे यांनी केली.

      

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली, मृत महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी सुषमा अंधारेंनी फलटणमध्ये पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला होता. त्यावेळी एसपी तुषार दोशी भेटले नसल्याने अंधारे आक्रमक झाल्या आणि त्यांनी पोलीस स्टेशन समोरच ठिय्या मांडला. डीवायएसपी विशाल खांबे यांनी सुषमा अंधारे यांच्याशी यावेळी चर्चा केली. यावेळी सुषमा अंधारे यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर गंभीर आरोप केले. “मृत महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी तिचं चारित्र्यहनन करण्यात आलं,” असा थेट आरोपही यावेळी सुषमाताई अंधारेंनी केला.

    

फलटण महिला डॉक्टर प्रकरणात ज्या सहा जणांची नावे आली आहेत त्यांना पोलीस वाचवत असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी जाणूनबुजून त्या डॉक्टरचे चारित्र्यहनन केल्याचा दावाही त्यांनी केला. सुषमाताई अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेत व्यवस्थेचे वाभाडे काढल्याचं दिसून आलं. मृत महिलेला न्याय मिळवून देण्यापेक्षा रुपाली चाकणकरांनी आणि पोलीस अधीक्षक तुषार दोषींनी तिचं चारित्र्यहनन केलं असा आरोपही अंधारेंनी केला. तसेच जयकुमार गोरे हे त्या महिलेचे चारित्र्य ठरवणार का? त्या आधी गोरेंनी स्वतःच्या चारित्र्याकडे बघावं असा टोलाही अंधारेंनी लगावला. या प्रकरणात जी सहा नावे आली आहे त्यांना चौकशीच्या कक्षात घ्यावे अशी जोरदार मागणीही अंधारेंनी केली.

     

फलटणमधील मृत महिलेला न्याय मिळावा यासाठी सुषमा अंधारेंनी फलटण शहर पोलीस स्टेशनवर मोर्चा आज सोमवारी दि .3 नोव्हेंबर रोजी काढला. त्यावेळी एसपी तुषार दोशी भेटले नसल्याने अंधारे आक्रमक झाल्या आणि त्यांनी पोलीस स्टेशन समोरच ठिय्या मांडला. डीवायएसपी खांबे यांनी सुषमा अंधारे यांच्याशी चर्चा केली. सुषमा अंधारेंनी त्यावेळी अनेक मुद्द्यांवरुन पोलिसांच्या तपास पद्धतीवर टीका केली

       

तुषार दोशींना काय अधिकार?


सुषमा अंधारेंनी या प्रकरणातील तपासासंबंधी माहिती मागितली असता ती माहिती अशी उघड करता येणार नाही असं पोलिसांनी सांगितलं. नेमका हाच धागा पकडत अंधारेंनी पोलीस अधीक्षक तुषार दोशींचे वाभाडे काढले. त्या म्हणाल्या की, "जर ही माहिती जाहीर करता येत नाही असं असेल तर रुपाली चाकणकरांनी त्या महिलेचे चॅट कसं जाहीर केलं? त्यावेळी त्यांच्या बाजूला बसलेल्या तुषार दोशींनी त्यांना का अडवलं नाही? तुषार दोशी हे नावाप्रमाणे वागले आणि त्यांनी मृत डॉक्टरचे ठरवून चारित्र्यहनन केलं का?"असा प्रश्न उपस्थित केला.

    

यावेळी फलटण पोलीस ठाणे छळछावणी झाली आहे. माझा आक्षेप पोलीस अधीक्षक तुषार दोशींवर आहे. अश्विनी बिद्रे प्रकरणात त्यांनी जे केलं ते अंतरवाली सराटीतही केले. त्यामुळे त्यांच्या तपासावर आमचा विश्वास नाही असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

या प्रकरणात ज्यांची नावं आली आहेत त्या सहा जणांची चौकशी करा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. डीवायएसपी राहुल धस, एपीआय जायपात्रे, माजी खासदारांचे दोन पीए शिंदे आणि नागटिळक, पोलीस उपनिरीक्षक पाटील आणि मेडिकल अधिकारी अंशुमन धुमाळ यांच्यावर आरोपपत्र का दाखल केलं नाही असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारला. या लोकांना डिपार्टमेंट वाचवत आहे का असंही सुषमा अंधारे यांनी विचारलं.

    

मुळात ज्या पोलिसांवर आरोप आहे किंवा संशय आहे त्यांची नावंच आरोपपत्रात नसेल तर मुलीच्या कुटुंबाच्या जबाबाला काहीच अर्थ नाही असा दावा सुषमाताई अंधारे यांनी केला. त्यामुळे या सहा जणांवर आरोपपत्र दाखल करून त्यांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली ती उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी

आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमल्याचे म्हटले जात होते. मात्र ती एसआयटी नसून तेजस्वी सातपुते यांची केवळ गुन्ह्याच्या तपासावरील देखरेखीसाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचा दावा अंधांरेंनी केला. तसेच या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. हा लढा कोणत्याही पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका माणसासाठी दिलेला आहे असं त्या म्हणाल्या.

    



संपदा मुंडे यांच्या मृत्यूप्रकरणी मी तीन नोव्हेंबर ला फलटण पोलिस ठाण्यात जाऊन त्या डॉक्टर युवतीच्या मृत्यूप्रकरणात माहिती घेणार असे सुषमा अंधारे यांनी जाहीर केले होते त्या अनुषंगाने आज सोमवार दि.3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता त्यांनी आपल्या हजारो समर्थकांसह फलटण मध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांनी फलटण शहरातील थोर समाजसेवकांना अभिवादन करून जशा बोलल्या होत्या त्या प्रमाणे "इलाका तुम्हारा धमाका हमारा" याप्रमाणे जोरदार एन्ट्री अंधारे यांनी करताच श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर (महाराज साहेब) यांच्या पुतळ्याजवळ राजेगटासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी अंधारे ताई येताच फाशी द्या फाशी द्या त्या नराधमांना फाशी देण्याची मागणी केली,या नंतर तहसील कार्यालय येथून पायी चालत जात फलटण शहर पोलिस ठाणे गाठले यावेळी प्रचंड गर्दी झाली होती त्यानंतर त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला अन् पोलिसांवर हल्लाबोल करीत त्या डॉक्टर युवतीला न्याय देण्याची जोरदार मागणी केली तसेच या संबंधी निवृत्त न्यायालयाच्या अध्यक्षते खाली समिती स्थापन करण्याची मागणी केली.

     

दरम्यान उन्हाच्या तडाखा प्रचंड असतानाही उन्हाची तमा न बाळगता शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी पोलिसांची पोलखोल केली त्याचबरोबर फलटण शहर,फलटण ग्रामीण व लोणंद पोलिस ठाण्यातील झालेल्या गुन्ह्याचे पुढे काय झाले?अद्याप गुन्हेगार मोकाट कसे?तपासात कोणी अडथळे आणले?कोणिकोणी दबाव आणले याचा पर्दाफाश केला त्याचबरोबर या प्रकरणात कोण कोण राजकारण केले?कोणिकोणी यात हस्तक्षेप केला,त्याचबरोबर डॉ.संपदा मुंडे यांनी अनेक लेखी तक्रार पोलिस ठाण्यात केल्या तरीही याकडे का दुर्लक्ष केले याचे उत्तर द्या अशी मागणी केली तसेच या प्रकरणात तपासी अधिकारी असलेल्या उपविभागीय पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांना त्यांनी विचारले की त्या डॉक्टर युवतीने अनेकांनी त्रास दिल्याचे सांगून त्या लोकांची नावे पुढे आलेली असताना त्या लोकांना अद्याप पर्यंत चौकशी साठी त्यांची नावे का या गुन्ह्यात घेतली नाहीत असा प्रश्न विचारला यावेळी उपविभागीय पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांनी सांगितले की हा तपासाचा भाग असल्याने मी तुम्हाला माहिती देऊ शकत नाही असे उडवाउडवीचे उत्तर दिले मात्र यावेळी सुषमाताई अंधारे यांनी सांगीतले की तुम्ही थोडा वेळ घ्या परंतु मला या प्रश्नांची उत्तरे द्या अशी जोरदार मागणी केली.

    

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर आल्या तेव्हा एस पी मागे पुढे करणारे आज कुठ गेले आहेत असा प्रश्न उपस्थित केला,या प्रकरणात मी या डॉक्टर युवतीला न्याय देण्यासाठी आली आहे तर आम्हाला पाठिंबा देण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असतील किंवा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील त्यांनी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी यावे असे आवाहन सुषमाताई अंधारे यांनी केले,

    

त्या डॉक्टर युवतीच्या भावाने सांगीतले की आम्ही नावे दिली तर त्या संशयितांना आरोपी करणार का?तिने नावे सांगितली तरीही त्यांची चौकशी का केली नाही त्याचा आम्ही धिक्कार करतो असे तिच्या भावाने सांगितले,यावेळी अनेकांनी पोलिसांनी कसे अन्याय केले त्याचा पाढाच अनेकांनी वाचून दाखवला तसेच या प्रकरणात इतर सहा जणांना सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे.


  

यावेळी माझ्या बायकोवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे सांगून स्वतःच्या हाताची नस दिपक निंबाळकर यांनी कापून घेतली तेव्हा अपंग असलेल्या त्यांच्या पत्नी यांनी गीता निंबाळकर यांनी पोलिसांच्या तोंडावर शिव्या घातल्या व पोलिसांनीच पैसे खाऊन माझ्यावर खोटी ॲट्रॉसिटीची केस करायला लावली असा आरोप करीत पोलिसांवर शिव्यांची लाखोळी वाहिली 


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER