Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

कराड सोसायटी मतदारसंघातील संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्नशील

पृथ्वीराज चव्हाण : कराड पालिकेत 'मलकापूर पॅटर्न' राबविण्याचे संकेत
टीम : धैर्य टाईम्स
Karad Society strives to avoid conflict in the constituency
जिल्हा बँक निवडणुकीत कराड सोसायटी गटातून दोन अर्ज असल्याने संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, याठिकाणी समविचारी उमेदवारांमधील संघर्ष टाळण्यासाठी मी मनापासून प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी सहकारातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांनाही भेटून त्यांच्याशी याविषयावर चर्चाही केली आहे.

कराड : जिल्हा बँक निवडणुकीत कराड सोसायटी गटातून दोन अर्ज असल्याने संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, याठिकाणी समविचारी उमेदवारांमधील संघर्ष टाळण्यासाठी मी मनापासून प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी सहकारातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांनाही भेटून त्यांच्याशी याविषयावर चर्चाही केली आहे. परंतु, त्याला कितपत यश येते, हे येत्या दोन दिवसात समजेल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
येथील त्यांच्या निवासस्थानी रविवारी ७ रोजी दुपारी पत्रकारांसाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सातारा जिल्हा बँकेची निवडणूक ही पक्षीय पातळीवरील नव्हे; तर सहकारातील निवडणूक आहे. दिवंगत विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे आणि माझे तात्विक मतभेद जरुर होते. मात्र, विलासकाका हे सहकारातील आणि जिल्हा काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते होते. त्यांनी ५४ वर्षे जिल्हा बँकेचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे कराड सोसायटी मतदारसंघात नक्कीच त्यांची ताकद आहे. यामुळे येथील समविचारी उमेदवारांमध्ये संघर्ष होऊ नये, अशी इच्छा असल्याने त्यादृष्टीने आपण प्रयत्न केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले, जिल्ह्यात दिवंगत किसनवीर आबा, लक्ष्मणराव तात्या अशा ज्येष्ठ नेत्यांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटूंबातील वारसांना त्यांनी प्रतिनिधित्व केलेल्या मतदार संघातूनच संधी देण्यात आली होती. मात्र, विलासकाका उंडाळकर यांच्या वारसांबाबत तसे घडताना का दिसत नाही? हा मुद्दा घेवून आपण राज्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना भेटून त्यांच्यासोबत यावर सविस्तर चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, ड्रग्ज, अंमली पदार्थांची तस्करी, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे प्रकरण यावर उपस्थित प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना ते म्हणाले, 20 हजार कोटींचे हेरॉईन बंदरावर आलेल्या प्रकरणाला कोणी दडपलं? एवढी मोठी कंसायमेन्ट कोणी व कोणाच्या नावावर पाठवली होती? हे सर्व प्रकरण दडपण्यासाठी ड्रग्जचे प्रकरण काढले आहे का? तसेच मूळ प्रकरणापासून लक्ष विचलित करण्यासाठी हे उद्योग सुरु आहेत का? या सर्व प्रकरणाची माहिती समोर आली पाहिजे. तसेच गुन्हा घडला असल्यास त्याची चौकशीही झाली पाहिजे. एनसीबी ही यंत्रणा पूर्णपणे केंद्र सरकारची आहे. त्या यंत्रणेने चांगले काम करून दोषींना शिक्षा करावी, अशी मागणी आहे. तसेच वानखेडे प्रकरणात केंद्र सरकारने खरी माहिती द्यावी. वानखेडे प्रकरणात केंद्र सरकारने खरे सांगितले पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कराड पालिकेत मलकापूर पॅटर्न
कॉंग्रेस पक्षाची  सर्वच निवडणूका पक्ष चिन्हावरच लढवण्याची भूमिका आहे. त्यानुसार कराड नगरपालिका निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी प्राथमिक चर्चा सुरु आहे. त्यामध्ये कराड पालिका पक्ष चिन्हावरच लढवावी, अशी त्यांचीही मागणी असून कराड पालिका निवडणूकीतही काँग्रेसकडून 'मलकापूर पॅटर्न' राबविण्याचे अप्रत्यक्ष संकेतही आ. चव्हाण यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना दिले.
कराड विमानतळाच्या २० किमी परिघामध्ये बांधकाम निर्बंधाचे आदेश केंद्रस्तरावरील आहेत. परंतु, त्यामुळे कराड व परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रमावस्था असल्याने याबाबत राज्यातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडेही सविस्तर माहिती उपलब्ध नाही, असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER