भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियान हा राष्ट्रीय उत्सव असून सर्व नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवून देशाभिमान जागृत करावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजीतसिंह नाईक - निंबाळकर यांनी केले. फलटण तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने हर घर तिरंगा अभियानांतर्गत खा.रणजीतसिंह नाईक - निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहरात तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष तिरंगा रॅलीत सहभागी झालेले खा.रणजितसिंह निंबाळकर, फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. उषा राऊत, सौ. माधवी कदम, उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप, तहसीलदार समीर यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी फलटण शहरातील गिरवी नाका, जुना डीएड कॉलेज चौक, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, छ.शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, उमाजी नाईक चौक,गजानन चौक मार्गे माळजाई मंदिरामार्गे रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो युवक - युवती, महिला व भाजपा पदाधिकारी, पोलीस अधिकारी व वनाधिकारी सहभागी झाले होते.