फलटण प्रतिनिधी:- कोळकी येथे पुर्वी झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून एकास कोयत्याने मारहाण केल्या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात एक जणांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 19 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अविनाश मनोहर गायकवाड ( रा. कोळकी ता. फलटण) हे कोळकी तिकाटणे शिंगणापुर रोड कोळकी येथे त्यांच्या भावाचे वडापावच्या गाड्यावर त्यास मदत करीत असताना पुर्वी झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून संतोष देवचंद मोरे (रा. सोनवडी खुर्द ता. फलटण) हा गाडीवरून रामचंद्र खिलारे यांचे वडापावच्या गाड्याजवळ येवून थांबला व अविनाश हे पत्नीसोबत बोलत असताना संतोष मोरे याने अचानक पाठीमागून येवून त्याचे हातातील कोयत्याने अविनाश याच्या मानेवर वार केला व दुसरा वार करत असताना वार चुकवण्यासाठी अविनाश याने उजवा हात समोर केला असता त्याने हातावर दुसरा वार केला. त्यानंतर अविनाश याने त्याच्या हातातील कोयता घेवून खाली टाकला व त्याला ढकलून दिले. याप्रकरणी संतोष देवचंद मोरे रा. सोनवडी खुर्द ता. फलटण याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.