Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात

श्रीरामच्या प्राधिकृत अधिकारी म्हणून श्रीमती प्रियंका आंबेकर, उपविभागीय अधिकारी, फलटण यांची नियुक्ती

टीम : धैर्य टाईम्स

फलटण | धैर्य टाईम्स | 

 प्रादेशिक सहसंचालक, (साखर), पुणे विभाग, पुणे यांच्या कार्यालयाकडून आज दिनांक २०/०३/२०२५ रोजी जा. क्र. प्राससंसा/प्रशासन/श्रीराम ससाका/कलम ७७ अ(ब)/५२७/२०२५ नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७७ अ (१) (ब) अन्वये श्रीराम सहकारी साखर कारखाना मर्यादित, फलटण, ता. फलटण, जि. सातारा या कारखान्याचे प्रशासकीय कामकाज पहाणेसाठी श्रीमती प्रियंका विठ्ठल आंबेकर, उपविभागीय अधिकारी, फलटण, ता. फलटण जि. सातारा यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 


नीलिमा गायकवाड, प्रादेशिक सहसंचालक, (साखर) पुणे विभाग, पुणे, यांनी आज दिलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, श्रीराम सहकारी साखर कारखाना मर्यादित, फलटण, ता. फलटण, जि. सातारा ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ अन्वये नोंदविण्यांत आलेली असून तिचा नोंदणी क्रं. जी. २६१ दि.२४/०७/१९५४ असा आहे व सदरहू कारखाना या कार्यालयाचे वैधानिक कार्यकक्षेत येत असून कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत दि. १७/०२/२०२५ रोजी संपुष्टात आलेली आहे. 


विश्वास भोसले यांनी मा. उच्च न्यायालय यांचेसमोर याचिका स्टॅम्प क्रं. ९१७७/२०२५ दाखल केली आहे. सदर याचिकेमध्ये नमूद हरकतीचे गांभीर्य लक्षात घेवून, सदर याचिकेसंदर्भात मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचा निर्णय होईपर्यंत सदरहू कारखान्याची निवडणूक पुढे ढकलेली आहे. त्यामुळे अनिश्चित कालावधीकरीता नविन संचालक मंडळ अस्तित्वात येवू शकत नसल्याने जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामुळे संस्थेवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७७ अ (१) (ब) परिस्थिती निर्माण झालेली आहे व त्या ठिकाणी प्राधिकृत अधिकारी यांची नेमणूक करणे आवश्यक झालेले आहे.


ज्याअर्थी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७७ अ नुसार समितीच्या सदस्याची नियुक्ती, नवीन समिती, समितीची घटना करीत असतेवळी कोणताही सदस्य निवडून न येणे व नवीन समितीने पदभार न स्वीकारणे यावेळी प्राधिकृत अधिकाऱ्याची नियुक्ती बाबत नमूद केले आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७७अ (१) (ब) मध्ये पुढीलप्रमाणे तरतूद आहे. "कोणत्याही संस्थेच्या समितीचा किंवा तिच्या कोणत्याही सदस्याचा पदावधी संपला म्हणून "कोणत्याही संस्थेच्या समितीचा किंवा तिच्या कोणत्याही सदस्याचा पदावधी संपला म्हणून किंवा इतर कोणत्याही कारणासाठी निवडणूक घेण्यात आली व त्यावेळी रिकाम्या जागा भरण्यासाठी आवश्यक असलेले सर्व किंवा कोणतेही सदस्य निवडण्यात कसूर झाली आहे.


 दि. ०७/०३/२०२५ चे पत्रासोबत रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी संसद सदस्य (लोकसभा) माढा यांचेकडील दि. ०६/०३/२०२५ रोजीचे निवेदनामध्ये नमूद केलेनुसार, सदरहू कारखान्याने मतदार याद्यांचे सादर केलेले प्रारुप हे सहकार कायदा व उपविधी प्रमाणे तयार न करता निवडणूक अधिकारी यांना सादर केल्या त्यावर हरकती घेण्यात आल्या परंतू मतदार याद्या दुरुस्त न करता सदोष मतदार याद्या सादर केल्या त्यामुळे सदर निवडणूक कायदेशीर व पारदर्शी होणार नाही सबब प्रशासक नियुक्ती करणेस विनंती केलेली आहे पत्रामध्ये संदर्भीय प्रशासक नेमणूकीबाबत केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने या कार्यालयाचे स्तरावर योग्य ती कार्यवाही करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. 


ज्याअर्थी कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपलेलो आहे आणि कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीच्या मतदार यादीबाबत तक्रार आहे आणि मा. उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये भविष्यात होणारी निवडणूक ही निष्पक्ष व पारदर्शीपणे होणे आवश्यक आहे. सदर निवडणूक प्रक्रिया ही मध्य टप्यावर आली असल्याने व ही निवडणूक निष्पक्ष व पारदर्शीपणे घेण्यासाठी प्राधिकृत अधिकारी नेमणे आवश्यक आहे 


त्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७७ (अ) (१) (ब) मधील तरतूदीनुसार प्रस्तुत आदेश तातडीने जारी करणे आवश्यक असल्याने सदर आदेश जारी करण्यापूर्वी त्याची नोटीस जाहीर करावयाची आवश्यता नाही.


महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७७ (अ) (१) (ब) मधील तरतूदीन्वये मला प्रदान करण्यांत आलेल्या अधिकारानुसार मी नीलिमा गायकवाड, प्रादेशिक सहसंचालक, (साखर) पुणे विभाग, पुणे, श्रीराम सहकारी साखर कारखाना मर्यादित, फलटण, ता. फलटण, जि. सातारा या कारखान्याचे प्रशासकीय कामकाज पहाणेसाठी श्रीमती प्रियंका विठ्ठल आंबेकर, उपविभागीय अधिकारी, फलटण, ता. फलटण जि. सातारा यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे असे आदेश दिले आहेत.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER