फलटण प्रतिनिधी -
महावितरण फलटण शहर उपविभागामध्ये फलटण शहर-1, फलटण शहर-2, फलटण शहर-3 व सोमंथळी शाखा अशा ४ शाखा आहेत. उपविभागातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर मिळून थकबाकीदारांची संख्या 5147 इतकी असून त्यांच्याकडे 95.83 लाखांच्या जवळपास थकबाकी आहे. थकबाकी ग्राहकांनी आपले विज बिल तात्काळ भरून होणारी गैरसोय टाळावी असे आवाहन महावितरणतर्फे विज ग्राहकांना करण्यात आले आहे.
वीजबिलाच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणने फलटण शहरात वारंवार रिक्षावर भोंगा लावून, ग्राहकांच्या दारात जाऊन वीजबिल भरण्याचे आवाहन केले आहे. तसेच थकबाकीदार ग्राहकांना नोटीसाही दिल्या आहेत. मात्र आता वसुलीसाठी केवळ दहा दिवसच शिल्लक असून आता थकबाकी वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सुरु आहे. तरी ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकीचा त्वरित भरणा करुन गैरसोय टाळावी असे आवाहन महावितरणतर्फे विज ग्राहकांना करण्यात आले आहे.