फलटण प्रतिनीधी:- मौजे पवारवाडी येथील अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारिरीक संबध केल्या प्रकरणी तीन जणाच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सुखदेव मिंड, त्यांची पत्नी राधा सुखदेव मिंड यांनी फिर्यादी यांची भाची ही अल्पवयीन आहे हे माहीत असताना सुध्दा त्यांनी त्यांचा मुलगा गणेश सुखदेव मिंड (सर्व राहणार पवारवाडी ता फलटण जि सातारा) यांनी तिला लग्नाचे अमिष दाखवून प्रेम संबंध निर्माण करण्यास लावले. त्यातुन गणेश सुखदेव मिंड याने दिनांक २१ अल्पवयीन मुलीस फुस लावुन फलटणला नेऊन तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारिरीक संबध करून त्याने भाची सोबत लग्न करण्यास नकार दिला. यानंतर अल्पवयीन मुलीने व तिच्या आईने दोघींनी आज दिनांक २२ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमाराला पवारवाडी गावच्या हद्दीत असलेल्या बहीणीच्या शेतातील विहरीमध्ये उडया मारून आत्महत्या केली आहे. या आत्महत्येस सुखदेव मिंड, राधा सुखदेव मिंड व गणेश सुखदेव मिंड हे जबाबदार आहेत अशी फिर्याद ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यांचा तपास सहायक पोलिस निरीक्षक रानगट करत आहेत.