फलटण- प्रतिनिधी
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोतर ( १५० ) सुवर्ण जयंती महोत्सव सोहळा शाही थाटात फलटणमधील राजर्षी शाहूराजे ज्ञान विकास प्रसारक मंडळाच्या वतीने नुकताच साजरा करण्यात आला दरम्यान शहरात शाहूराजेंच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली
मंगळवार पेठेतुन निघालेल्या जयंती महोत्सव सोहळ्याचा शुभारंभ मंडळाचे अध्यक्ष बापु साहेब जगताप यांचे हस्ते करण्यात आला या प्रसंगी मंडळाचे सल्लागार डॉ . प्रा .प्रभाकर पवार ज्येष्ठ पत्रकार प्रा . रमेश आढाव , जयंती महोत्सव समितीचे सदस्य प्रदिप जगताप , मुरलीधर सावंत , निंभोरेआश्रमशाळेचे मुख्याध्यापक बंडी सर , अनिल महामुनी सर , शिंदेसर , नंदकुमार गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
शतकोतर सुवर्ण जयंती महोत्सव सोहळ्यात लेझीम , झांज पथक , सनई ,हलगी , संबळ , तुतारी आदी पारंपारिक वाद्याचा समावेश करण्यात आला होता आकर्षक पानाफुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलींमध्ये भगवान गौतम बुद्ध , म .फुले छत्रपती शाहूराजे, डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा बसविण्यात आल्या होत्या महापुरुषांच्या जयघोषासह शाहूराजे, डॉ.आंबेडकर यांच्या जीवनावर अधारीत गितांचे सादरीकरण करून जयंती सोहळा मिरवणुकीद्वारे फलटण शहरातील प्रमुख चौक व मार्गावरून काढण्यात आला होता. रंगीबेरंगी फेटा परिधान केलेल्या शालेय विद्यार्थ्यानी शाहू महाराजाच्या गाण्यावर केलेले लेझीम प्रात्यक्षीकांनी अवघ्या शहरवासीयांचे लक्ष वेधले होते मुलींचे लेझीम प्रात्यक्षिक मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले असल्याने उपस्थित नागरीकांमधुन लेझीम प्रात्यक्षिकास उत्स्फुर्त दाद मिळत असल्याचे मिरवणुकदरम्यानचे चित्र होते. शाहूराजे जयंती सोहळा यशस्वीतेसाठी गणेश अहिवळे, संजय अहिवळे, अमर काकडे, कुंदन अहिवळे, राजेश काकडे, राजरत्न जगताप, आकाश काकडे, वैभव काकडे, निलेश मोरे आदींनी परिश्रम घेतले
जयंती मिरवणुकीत आरपीआयचे ज्येष्ठ पदाधिकारी विजय येवले, मुन्ना शेख, राजु मारूडा, सनी काकडे, जितेंद्र कांबळे, सतीश अहिवळे, पत्रकार शक्ती भोसले, विकास अहिवळे, शुभम गुंजाळ, ओम भोई, प्रेम घुले, शुभम जगताप यांचे सह शहरातील नागरिक सहभागी झाले होते. जयंती सोहळा सांगता समारंभानंतर मंडळाच्या वतीने लाडु वाटप करण्यात आले