फलटण प्रतिनीधी : आय.डी.बी.आय बँकेचे ए.टी.एम मधील डिपाँजिट मशीनमधील २८ हजार ३०० रूपये भरणा केलेली रक्कम चोरून नेल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि.९/९/२०२४ रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास आय.डी.बी.आय बँक, डेक्कन चौक शेजारी फलटण, ता.फलटण, जि.सातारा येथील ए.टी.एम.मध्ये असलेले डिपाँजिट मशीनमधुन फिर्यादी सचिन रामराव निंबाळकर ( रा.वाठार निंबाळकर, ता.फलटण) हे आय.डी.बी.आय बँकेचे ए.टी.एम मधील डिपाँजिट मशीनमध्ये २८ हजार ३०० रूपये भरणा करण्या करीता गेले असता त्यांना फोन आल्याने ते डिपाँजिट मशीनमध्ये डिपाँजिट बटन न दाबता घरी निघुन गेले. त्यानंतर थोड्याच वेळात त्या ठिकाणी एक अनोळखी व्यक्ती याने येवुन त्याने डिपाँजिट मशीनमध्ये कँश बाँक्समध्ये फिर्यादीने ठेवलेली २८ हजार ३०० रूपये रक्कम फिर्यादी यांच्या संमतीशिवाय स्वत:चे फायद्याकरीता मुद्दाम लबाडीने चोरी करून निघुन गेला अशी फिर्याद शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली असून अधिक तपास म.पो.हवा. माधवी बोडके करत आहेत.