पतीचे काम सुटल्याने घर खर्चासाठी माहेरहून पैसे आणावेत, यासाठी विवाहिता प्रियांका कुंडलिक सोळवंडे (वय 33, रा. करंजे पेठ, सातारा) यांचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासूवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
सातारा : पतीचे काम सुटल्याने घर खर्चासाठी माहेरहून पैसे आणावेत, यासाठी विवाहिता प्रियांका कुंडलिक सोळवंडे (वय 33, रा. करंजे पेठ, सातारा) यांचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासूवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
कुंडलिक साजन सोळवंडे (वय 34), गिरीबाई साजन सोळवंडे (वय 55, रा. कुंडल, ता. पलुस, जि. सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्या पती आणि सासूचे नाव आहे. प्रियांका सोळवंडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पती व सासूने मारहाण शिवीगाळ करून पतीचे काम सुटल्याने घर खर्चासाठी पैसे आणावेत म्हणून वारंवार शारीरीक व मानसिक जाचहाट केला.