पठाण नामक या पटठ्याने आपली स्वतःची सॅलरी (पगारवाढ) करून तब्बल वीस लाख रुपयांचा चुना पंचायत समितीला लावला असताना जिल्हा परिषद किंवा राज्य सरकारच्या आर्थिक विभागाला याची कल्पना नव्हती का?
फलटण प्रतिनिधी -
पंचायत समिती फलटणच्या कनिष्ठ अभियंता याने आपल्या पदाचा गैरवापर करीत तब्बल वीस लाख रुपयांचा शासनाला अक्षरशः चुना लावला असून या प्रकरणाने फलटण तालुक्यासह जिल्यात एकच खळबळ उडाली आहे. त्याची बदली पाटण येथे झाल्याची माहिती समोर आली आहे.
फलटण पंचायत समिती येथे कनिष्ठ अभियंता पठाण या पठ्ठ्याने पोर्टलवर आपली सॅलरी परिपत्रकात वाढ करून आपला पगार वाढवून तब्बल वीस लाख रुपये उकळले असून त्याच्या या प्रतापाणे फलटण पंचायत समितीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
मागील 2023 ते 2025 या काळात हा अपहार केला असल्याची माहिती मिळताच विभागीय चौकशी सुरू झाली आहे असे सांगण्यात आले आहे. तो पठ्ठ्या या अगोदर खंडाळा येथे कार्यरत असल्याची माहिती मिळाली असून त्यानंतर फलटण येथे 2023 ते 2025 या काळात त्याने हा प्रताप केल्याचे उघड झाले आहे. सध्या तो पाटण येथे शासकीय सेवेत कार्यरत असल्याचे संगण्यात आले आहे.
दरम्यान गेली चार वर्षे झाली प्रशासन राजवट फलटण पंचायत समिती मध्ये होती. अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी लाखो रुपयांचा अपहार केला असून कुपंनच शेत खात असल्याची चर्चा आता रंगू लागल्या आहेत. पंचायत समिती कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांनी भोंगळ कारभार करत चुना लावला असल्याचे स्पष्ट दिसत असून प्रशासकीय राजवटीतील झालेल्या संपूर्ण व्यवहाराची जिल्हा परिषदेच्या आर्थिक विभागाने चौकशी करून भोंगळ कारभाराचा पर्दाफाश करावा अशी मागणी होत आहे.
दरम्यान पठाण नामक या पटठ्याने आपली स्वतःची सॅलरी (पगारवाढ) करून तब्बल वीस लाख रुपयांचा चुना पंचायत समितीला लावला असताना जिल्हा परिषद किंवा राज्य सरकारच्या आर्थिक विभागाला याची कल्पना नव्हती का? की अजून कोणी - कोणी असाच गैरप्रकार केला आहे का?याची खोलात जाऊन संपुर्ण चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.
फलटण पंचायत समितीच्या कारभाराची आत्तापर्यंतच्या काळात अनेक प्रकरणे बाहेर पडली होती मात्र कारवाईचा बडगा वरिष्ठ अधिकारी कधीच उगारत नाहीत यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी निवृत्त न्यायाधीशांची कमिटी नेमून फलटण पंचायत समितीच्या कू कारभाराचा भांडाफोड करावा अशी मागणी होत आहे.
दरम्यान या प्रकरणाबाबत प्रभारी गटविकास अधिकारी प्रकाशकुमार बोमले यांच्याकडे माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की याची चौकशी सुरू आहे.
फक्त स्वतःच्या फायद्याकरिता या पटठ्याने हा आर्थिक घोटाळा केला आहे का?की अजून कोणते अधिकारी कर्मचारी किंवा रॅकेट या मागे आहे याचा खोलात सिईओ याशनि नागराजन यांनी जाऊन या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्याची मागणी करण्यात आली आहे.










