Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघात ३९ नामनिर्देशन पत्र दाखल - उपविभागीय अधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी सचिन ढोले : संविधान समर्थन समितीच्या वतीने बौद्ध समाजातून उमेदवारी अर्ज दाखल

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी -

२५५ फलटण - कोरेगाव (अ.जा.) विधानसभा मतदार संघासाठी एकूण ५९ जणांनी ९० नामनिर्देशन अर्ज खरेदी केले असून ३९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन सचिन ढोले यांनी दिली. 

आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २६ अर्ज दाखल झाले तर एकूण ३९ नामनिर्देशन दाखल झाले आहेत. आज दिगंबर आगवणे व त्यांची पत्नी सौ. जयश्री आगवणे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी तहसील परिसरात चोक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सचिन भिसे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. तर प्रशांत कोरेगावकर यांनीही भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष असे नामनिर्देशन दाखल केले आहे. 

यापूर्वीच विद्यमान आमदार दिपक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला महायुतीतून मतदारसंघ सुटल्याने मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे सहकारी सचिन कांबळे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत महायूतीतून नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. 

२००९ मध्ये नव्याने निर्माण झालेल्या राखीव विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या बौध्द समाजातील घटकाला गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली पार्श्वभूमीवर २०२४ च्या होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत बौध्द समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी अवघ्या फलटण - कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील बौध्दांनी " एकच निर्धार ...बौद्ध आमदार ' अशी प्रतिज्ञा घेत तालुक्यात संवाद अभियान सुरू केले होते. 

खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. रामराजे नाईक निंबाळकर यांना भेटून बौद्ध समाजाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रतिनिधित्व मिळावे याकरिता निवेदन देत मागणी केली होती. मात्र वरील पैकी कोणत्याही पक्षाने बौद्ध समाजाला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे अखेर संविधान समर्धन समितीच्या वतीने नंदु मोरे, बुवासाहेब हुंबरे, गंगाराम रणदिवे व प्रा. रमेश आढाव यांनी (अपक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटना) अशी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.

उद्या दिनांक ३० ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाईल तर दि ४ नोव्हेंबर पर्यंत नामनिर्देशन अर्ज मागे घेता येतील आणि दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल दिनांक २३ नोव्हेंबर ला मतमोजणी करण्यात येईल अशी माहिती यावेळी ढोले यांनी दिली. 

फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघात एकूण मतदार ३३८४६४ इतके मतदार असून पुरुष मतदार १७२४५९ तर स्त्री मतदार  १६५९९१ आहेत व इतर मतदार संख्या १४ इतकी आहे. यामध्ये सैनिक मतदार         ९५६ दिव्यांग मतदार २१६० असल्याची माहिती सचिन ढोले यांनी दिली. मतदार संघातील एकूण मतदान केंद्र ३५५ आहेत.शहरी मतदान केंद्र ४७,ग्रामिण मतदान केंद्र ३०८ आहेत. 



राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार दिगंबर आगवणे हे सध्या काही गुन्हामध्ये अटक आहेत. ते आज नामनिर्देशात पत्र दाखल करण्यासाठी आले होते. त्यावेळी आगवणे समर्थकांची मोठी गर्दी तहसील परिसरात झाली होती. 


संविधान समर्थन समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन येथून तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली होती. एकच निर्धार बौद्ध आमदार च्या घोषणा देत बौद्ध समाजातील उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER