Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

फलटण लायन्सच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी विकास प्रकल्प : श्रीमंत संजीवराजे

टीम : धैर्य टाईम्स

लायन्स क्लब फलटणच्या माध्यमातून फलटण शहर व परिसरात अनेक लोकोपयोगी विकास प्रकल्प उभे राहिले आहेत, विशेषत: लायन्स मुधोजी नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून अंधत्व निवारणाचे खूप मोठे काम झाले असून आजपर्यंत सुमारे ३३ हजार मोती बिंदू नेत्र शस्त्रक्रिया, लाखो चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले असल्याचे निदर्शनास आणून देत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण लायन्स क्लबच्या सेवा कार्याचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.

येथील महाराजा मंगल कार्यालयात आयोजित फलटण लायन्स क्लब नवनिर्वाचित अध्यक्ष ला. विजयकुमार लोंढे - पाटील, लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या नवनिर्वाचित अध्यक्षा ला. सौ. सविता दोशी, लिओ क्लब फलटण प्लॅटिनमचे नवनिर्वाचित अध्यक्ष कौशल यादव या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या शपथविधी व पदग्रहण समारंभात विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी लायन्स मल्टिपल कौन्सिल सेक्रेटरी ला. सुनील सुतार, प्रथम उप प्रांतपाल ला. भोजराज नाईक निंबाळकर, माजी प्रांतपाल प्राचार्य डॉ. राजेंद्र शहा, द्वितीय उप प्रांतपाल ला. एम. के. पाटील, माजी प्रांतपाल ला. पांडुरंग शिंदे, ला. मिलिंद शहा, ला. मामासाहेब जाचक, ला. जगदिश पुरोहित व ला. प्रभाकर आंबेकर, रिजन चेअरमन ला. डॉ. महेश खुस्पे, झोन चेअरमन ला. प्रमोद जगताप, लायन्स मुधोजी नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष ला. अर्जुनराव घाडगे, सेक्रेटरी ला. चंद्रकांत कदम, खजिनदार ला. जगदीश करवा, ला. राजीव निंबाळकर, डिस्ट्रिक्ट लायन्स क्वेस्ट चेअरपर्सन ला. सुहास निकम यांच्या सह फलटण लायन्स क्लबचे आजी माजी पदाधिकारी, सभासद आणि फलटणकर उपस्थित होते.

 फलटण लायन्स क्लबने राबविलेल्या अनेक समाजोपयोगी उपक्रमामुळे फलटणकरांना दिलासा मिळालाच त्याशिवाय प्राचार्य ला. डॉ. राजेंद्र शहा यांच्या नंतर ला. भोजराज नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून प्रांतपाल पदाची संधी दुसऱ्यांदा प्राप्त होत असल्याचे निदर्शनास आणून देत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

 श्रीमंत संजीवराजे म्हणाले, विशेष करुन लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये खूप मोठे काम झाले, प्रामुख्याने शिक्षकांसाठी घेतलेला टिचर ट्रेनिंग प्रोग्रॅम त्यांनी उत्तमरीत्या राबविला, तसेच सध्या पर्यावरण हा विषय खूप महत्त्वाचा आहे. अवेळी पडणारा पाऊस, वादळ, वारे व सुनामी, ज्वालाग्रहीचा उद्रेक, भूकंपाचे वाढते प्रमाण असे अनेक प्रकार होताना दिसत असल्यामुळे पर्यावरण क्षेत्रामध्ये खूप मोठे काम होणे गरजेचे असल्याचे ओळखून लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमने वृक्षारोपणाच्या मोहिमा राबवून त्या यशस्वी केल्या असल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी निदर्शनास आणून देत सर्वांना धन्यवाद दिले.

 प्रमुख अतिथी ला. सुनील सुतार म्हणाले, गेली २५ वर्षे आपण लायन्स क्लबच्या माध्यमातून काम करीत आहोत, मात्र गेल्या पंचवीस वर्षांमध्ये सर्वात सुंदर काम लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या माध्यमातून यावर्षी झाले असून त्याचे श्रेय लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या अध्यक्षा ला. सौ. निलम लोंढे - पाटील, सेक्रेटरी ला. सौ. वैशाली चोरमले, खजिनदार ला. सौ. मंगल घाडगे यांच्या टीमला जाते. त्यांनी गेल्या वर्षामध्ये खूप मोठे सेवाकार्य केले असल्याने लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमला सर्व पुरस्कार मिळाले असून इंटरनॅशनल स्तरावर याची नोंद झाली आहे.   

नूतन पदाधिकाऱ्यामध्ये लायन्स क्लब फलटणचे अध्यक्ष ला. विजयकुमार लोंढे - पाटील, लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या अध्यक्षा ला. सौ. सविता दोशी, लिओ क्लब फलटण प्लॅटिनमचे अध्यक्ष लिओ कौशल यादव व त्यांच्या सर्व टीमने याही पेक्षा पुढील वर्षी चांगले काम करुन फलटणच्या नाव लौकिकात भर घालावी अशी अपेक्षा व्यक्त करीत ला. सुनील सुतार यांनी त्यांना त्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 यावेळी गडहिंग्लज क्लबचे ला. डॉ. किरण खोराटे, ला. डॉ. कल्याणी खोराटे, खेड (कोकण) येथील ला. डॉ. वीरेंद्र चिखले, ला. डॉ. विनया चिखले आणि सातारा रिजन २ मधील सर्व क्लबचे सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते. 

स्वागत प्रास्तविक ला. मंगेश दोशी, सूत्र संचालन गणेश तांबे सर आणि समारोप व आभार प्रदर्शन माळजाई उद्यान समिती चेअरमन ला. प्रतापसिंह निंबाळकर यांनी केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER