अनेक कॅफे हाऊस मध्ये जोडप्यांना बसण्याची योग्य "ती " सोय केल्याचे दिसून येत आहे. तर अनेक ठिकाणी मंद ( पूर्ण अंधार ) प्रकाशा योजना जाणीवपूर्वक केल्याचे भयंकर प्रकार फलटण मध्ये पहावयास मिळत आहेत.
फलटण : (प्रतिनिधी )
पुणे - मुंबई सारख्या महानगरांचे अनुकरण करत अनेक शहरांनी अत्याधुनिकरणाकडे वाटचाल केली आहे. मात्र यासारख्या महानगरा मधील फोफावलेल्या चंगळवादाचे अनुकरण करून बेफाम तरुणांई फलटण सारख्या सुसंस्कृत शहरातील संस्कृतीची हेळसांड करीत असल्याचे चित्र सध्या फलटण शहरात दिसू लागले आहे. उदाहरण म्हणजे फलटण शहरात सुरू असणारा कॅफे व्यवसाय.
फलटण शहरातील कॅफे व्यवसायाच्या नावाखाली सुरू असणारा तरुणाईचा बेफाम हैदोस फोफावलेल्या चंगळवादाचे अनुकरण सध्या पालकांची डोकेदुखी ठरू पाहत आहे. पोलिसांच्या बेपरवाई वृत्तीमुळे बेफाम तरुणांई याला बळी पडत आहे. याचे अक्राळ विक्राळ स्वरूप स्वरूप महानगराने अनुभवलेले आहेच.आता हे लोण ग्रामीण भागात कमी जास्त प्रमाणात दिसून येत आहे.
अनेक कॅफे हाऊस मध्ये जोडप्यांना बसण्याची योग्य "ती " सोय केल्याचे दिसून येत आहे. तर अनेक ठिकाणी मंद ( पूर्ण अंधार ) प्रकाश योजना जाणीवपूर्वक केल्याचे भयंकर प्रकार फलटण मध्ये पहावयास मिळत आहेत.
अशा कॅफे हाऊस च्या नावाखाली बेफाम तरुण तरुणांना मोकळीक देत फलटण मध्ये तरुणांचा हैदोस घालणाऱ्या कॅफे हाऊस वर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातून होऊ लागली आहे.