फलटण प्रतिनीधी:- मौजे खामगाव व पठार वस्ती येथे दोन ठिकाणी अवैध दारू विक्री प्रकरणी दोन जणांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, एका कारवाईत मौजे खामगाव साखरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा गावचे हद्दीत घराचे आडोशाला हनुमान केज राठोड (रा. साखरवाडी ता. फलटण) यांच्याकडे अवैध दारू आढळून आली असता १ हजार ५० रुपये देशी दारू सखु संत्रा असे लेबल असलेल्या १८० मिलीच्या पंधरा सीलबंद काचेच्या बाटल्या प्रत्येकी किंमत ७० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला असून ग्रामीण पोलिस ठाण्यात याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास स.पो.फौ.हांगे करत आहेत.
दुसऱ्या कारवाईत मौजे पठार वस्ती ताथवडा तालुका फलटण जिल्हा सातारा गावचे हद्दीत राहते घराचे आडोशाला उघड्यावर दारूविक्री करताना अश्विनी बबन जाधव ( रा. पठार वस्ती ता. तालुका फलटण) यांच्याकडे अवैध दारू आढळून आली असता ६३० रुपये देशी दारू सखु संत्रा टांगो असे लेबल असलेल्या १८० मिलीच्या ९ सीलबंद काचेच्या बाटल्या प्रत्येकी किंमत ७० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला असून ग्रामीण पोलिस ठाण्यात याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो.ना.बनकर करत आहेत.