फलटण प्रतिनिधी:-
फलटण पंढरपूर हायवेवर तांबमळा येथील गुरू हॉटेलचे पुढे दहा चाकी टिपर ने फलटण येथील दोन तरुणांना दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला असून या मृत्यूमुळे फलटण शहरात शोककळा पसरली आहे.
या घटनेबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दि.१६ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास फलटण पंढरपूर हायवेवर तांबमळा येथील गुरू हॉटेलचे पुढे टाटा कंपनीचा 10 चाकी टिपर क्र.MH-09-FL-6088 या गाडीवरील चालक अमित साह ललनसाह (मुळ रा.ग्रामपोस्ट कटराकला थाना मोहानिया जि.कैमुर भभुआँ राज्य बिहार, सध्या रा.RKCप्लँन्ट धुळदेव ता.फलटण) याने रस्त्याचे परिस्थितीकडे लक्ष न देता,रस्त्यावरती गाडी भरधाव वेगात चालवुन समोरून येणारे बुलेट गाडी क्र.MH-11-CP-4778 वरील अमिर ताजुद्दीन शेख (वय-32वर्षे रा.शुक्रवार पेठ फलटण) व गणेश सुनिल लोंढे (वय-35 वर्षे रा.मंगळवार पेठ फलटण) यांना समोरून जोराची धडक देवुन त्यांना गंभीर जखमी करून त्यांच्या मृत्युस कारणीभुत झाला तसेच बुलेटचे नुकसानीस कारणीभुत झाला अशी फिर्याद टिपर चालका विरूद्ध फिर्यादी जमशेद दादामिया पठाण (रा.शुक्रवार पेठ फलटण) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.