फलटण प्रतिनिधी:- गोवंशी खिल्लार जातीच्या दोन देशी गाई व एक जर्शी गाय दाटीवाटीने भरून चारापाण्याची कोणती व्यवस्था न करता कत्तल करण्यासाठी वाहतूक करीत असताना आढळून आल्या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १ रोजी रात्री १२:१० वाजण्याच्या सुमारास मौजे निंबळक तालुका फलटण गावाच्या हद्दीत संशयीत आरोपी युवराज खलाटे हा वसीम कुरेशी याचे सांगणे वरून महिंद्रा पिकप टेम्पो गाडी क्रमांक एम.एच.११.टी.७९८५ मध्ये गोवंशी खिल्लार जातीच्या दोन देशी गाई व एक जर्शी गाय दाटीवाटीने भरून चारापाण्याची कोणती व्यवस्था न करता कत्तल करण्यासाठी वाहतूक करीत असताना आढळून आले. याप्रकरणी युवराज शंकर खलाटे (रा. खुंटे ता. फलटण) जिल्हा सातारा, वसीम कुरेशी (रा. कुरेशी नगर ता. फलटण) यांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो. ह साबळे करत आहेत.