फलटण प्रतिनिधी :-मौजे आदरुड येथे पती पत्नीस सहा जणांनी लोखंडी रॉड, लाकडी दांडके, खोरे यांनी मारहाण केल्या प्रकरणी सहा जणांचे विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितनुसार, मौजे आदरुड ता फलटण जि. सातारा गावाच्या हद्दीत फिर्यादीचे राहते घरासमोर दिनांक 28 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी हरिदास शंकर राऊत, सुवर्णा हरिदास राऊत, रामदास हरिदास राऊत, पुनम रामदास राऊत, लखन हरिदास राऊत, सचिन धनाजी राऊत (सर्व राहणार आंदरुड ता. फलटण जि. सातारा) यांनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी विमल विलास राऊत ( राहणार आंदरुड, ता. फलटण, जि सातारा) व त्यांचे पतीस तुम्हाला जास्त मस्ती आली आहे असे म्हणत शिवीगाळ करत संशयित आरोपी हरिदास शंकर राऊत यांनी त्यांचे हातातील खोरे फिर्यादी यांचे पतीच्या तोंडावर मारून जखमी केले संशयित आरोपी रामदास हरिदास राऊत यांनी त्याची हातातील रॉडने फिर्यादीच्या पतीच्या पायावर मारले संशयित आरोपी लखन हरिदास राऊत यांनी हातातील लाकडी काठीने फिर्यादीचे पतीच्या पाठीत मारले व फिर्यादी यांना संशयित आरोपी सुवर्ण हरिदास राऊत व संशयित आरोपी पुनम रामदास राऊत यांनी फिर्यादी यांना खाली पाडून हाताने, लाथाबुक्कयांनी मारहाण केली तसेच संशयित आरोपी सचिन तानाजी राऊत यांनी देखील फिर्यादी यास लाथाबुकक्यांनी मारहाण केली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा अधिक तपास पो.हवा.चांगण करत आहेत.