फलटण प्रतिनीधी:- कुरवली पाटी येथे एक जणास पाच जणांनी तलवारीने व गजाने केलेल्या मारहाणीत गंभीर दुखापत झाली असून याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २६ रोजी ७:१५ च्या सुमारास कुरवली पाटी येथील सावता माळी हॉटेलच्या समोर फिर्यादी विनोद किसन सांगळे (राहणार- राजुरी, तालुका फलटण,जिल्हा सातारा) हे हॉटेलच्या समोर थांबले असता ज्ञानदेव आनंदा गावडे, पंकज ज्ञानदेव गावडे, मधुकर आनंदा गावडे, बाळू उर्फ प्रथमेश ज्ञानदेव गावडे, ओंकार संपत सांगळे (सर्व रा.राजूरी ता. फलटण जि.सातारा) यांनी कार उभी करुन गाडीतुन खाली उतरत असताना त्यांच्या जवळ असलेल्या पोत्यातुन ज्ञानदेव आनंदा गावडे याने पोत्यातील तलवार काढून
फिर्यादी विनोद किसन सांगळे याच्या जवळ जावून "तुला मी खल्लास करणार आहे" असे म्हणुन त्याने त्याचे हातातील तलवारीने कपाळावर भुवयांचे दोन्ही मध्यभागी मारून जखमी केले. त्यानंतर पंकज ज्ञानदेव गावडे याने त्याचे कडील असले तलवारीने डोक्याच्या डाव्या बाजुस वार करुन जखमी केले. त्यानंतर मधुकर आनंदा गावडे याने त्याचेकडील असलेल्या तलवारीने डोक्याचे पाठीमागील बाजुस वार करुन जखमी केले. बाळू उर्फ प्रथमेश ज्ञानदेव गावडे याने त्याचेकडील असले तलवारीने फिर्यादीच्या डोक्यात वार करत असताना फिर्यदिने उजव्या हाताने प्रतिकार करताना त्याने पुन्हा उजव्या हाताचे पंजावर वार करून जखमी कले .
त्यानंतर ओंकार संपत सांगळे याने त्याचे हातात असले गजाने डाव्या हाताचे पोटरीवर मारुन गंभीर केले त्यानंतर फिर्यदीला सुरू असलेली मारहाण पाहुन त्या ठिकाणी जमलेल्या लोकांनी सोडवा सोडव करत गाडीत फिर्यादी याला उपचारकामी फलटण येथे घेवून जात असताना बरड गावचे हद्दीत इंडीयन पेट्रोलपंपाचे समोर फलटण बाजुकड़े प्रवास करीत असताना पाठीमागुन पैलवान असे लिहलेल्या गाडीत येवुन फिर्यदीच्या गाडीला गाडी आडवी मारण्याचा प्रयत्न करुन त्यातील लोकांनी तलवारी दाखवुन ते तेथुन शिवीगाळ करुन निघुन गेले.
त्यानंतर उपचारकामी खाजगी दवाखान्यात फलटण येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी फिर्यादीच्या जखमा पाहुन व फिर्यादीच्या हाताचा एक्सरे काढुन तो फ्रैक्चर झाल्याचे सांगितले फिर्यादीच्या हाताचे व डोक्यातील सर्व जखमांना टाके टाकून फिर्यादीस पुढील उपचाराकामी दुसऱ्या खाजगी दवाखान्यात रेफर केले असता डॉक्टरांनी डोक्याचे सिटीस्कॅन केले व कपाळाचे मध्यभागी असणारे हाड फ्रैक्चर झाल्याचे सांगितले. या प्रकरणी ज्ञानदेव आनंदा गावडे, पंकज ज्ञानदेव गावडे, मधुकर आनंदा गावडे, बाळू उर्फ प्रथमेश ज्ञानदेव गावडे, ओंकार संपत सांगळे (सर्व रा.राजूरी ता. फलटण जि.सातारा) या पाच जणाच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.