Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

जिल्हा बँकेसाठी चुरशीने 96.33 टक्के मतदान

जिल्हा निवडणूक अधिकारी मनोहर माळी यांची माहिती
टीम : धैर्य टाईम्स
96.33 per cent turnout for District Bank
जिल्हा बँकेसाठी सहकार पॅनेल विरुध्द अपक्ष अशी 10 जागांसाठी 20 जणांमध्ये आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात 11 मतदान केंद्रावर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1964 पैकी 1892 मतदारांनी मतदानांचा हक्क बजावल्याने 96.33 टक्के मतदान झाले.

सातारा : जिल्हा बँकेसाठी सहकार पॅनेल विरुध्द अपक्ष अशी 10 जागांसाठी 20 जणांमध्ये आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात 11 मतदान केंद्रावर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1964 पैकी 1892 मतदारांनी मतदानांचा हक्क बजावल्याने 96.33 टक्के मतदान झाले.
सकाळी जावली मतदान केंद्रावर राजंणे आणि शिंदे या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला होता. नंतर हा वाद मिटला अन् दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकत्र होते. खटाव मतदान केंद्रावर थेट कारागृहातून माजी आमदार प्रभाकर घार्गे हे दाखल झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे भावनिक स्वागत केले. पाटणमध्ये पारंपारिक लढत असल्याने मतदानांचा टक्का वाढला.
जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी 21 जागांसाठी यापूर्वीच 11 जागा सहकार पॅनेलच्या बिनविरोध झालेल्या आहेत. उरलेल्या 10 जागांसाठी सहकार पॅनेल विरुद्ध अपक्ष अशा लढतीचे आज मतदान झाले. सातारा मतदान केंद्रावर 416 मतदारांपैकी महिला व इतर मागासवर्ग राखीवसाठी 397 मतदान, नागरी बँकासाठी 85 असे एकूण 397 (95.43 टक्के) मतदान झाले. जावली मतदान केंद्रावर 69 मतदारांपैकी सोसायटीसाठी 49 जणांनी महिला, इतर मागासवर्गीय राखीवसाठी 69 तर नागरी बँकांसाठी 7 जणांनी असे एकूण 69(100टक्के) मतदान झाले. महाबळेश्वर केंद्रावर 48 मतदारांपैकी महिला व इतर मागासवर्गीयांसाठी 44 जणांनी तर नागरी बँकांसाठी 14 जणांनी अशी 44(91.67 टक्के) जणांनी मतदान केले. कराड मतदान केंद्रावर 332 मतदारांपैकी सोसायटीतून 140 जणांनी, महिला व इतर मागासवर्गीयसाठी 325 जणांनी, नागरी बँकांसाठी 67 जणांनी असे 325 (97.89टक्के) जणांनी मतदानांचा हक्क बजावला.
पाटणमध्ये मतदान केंद्रावर 203 मतदारांपैकी सोसायटीसाठी 102 जणांनी, महिला व मागासवर्गीयसाठी 197 जणांनी, नागरी बँकांसाठी 29 जणांनी असे 197 (97.04टक्के) मतदान झाले. कोरेगाव मतदान केंद्रावर 131 मतदारांपैकी सोसायटीसाठी 90 जणांनी, महिला व इतर मागासवर्गीय राखीवसाठी 126 जणांनी, नागरी बँकांसाठी 19 जणांनी असे एकूण 126(96.18टक्के) मतदान झाले. खटाव मतदान केंद्रावर 150 मतदारापैकी सोसायटीसाठी 103 जणांनी, महिला व इतर मागासवर्गीयसाठी 150 जणांनी, नागरी बँकासाठी 18 जणांनी असे एकूण 150(100 टक्के) जणांनी मतदान केले. माण मतदान केंद्रावर 119 मतदारापैकी सोसायटीसाठी 72 जणांनी, महिला व मागासवर्गीयसाठी 110 जणांनी, नागरी बँकांसाठी 23 जणांनी असे एकूण 110 (92.44 टक्के) जणांनी मतदान केले. खंडाळा मतदान केंद्रावर 88 मतदारांपैकी महिला व इतर मागासवर्गीयांसाठी 87 जणांनी, नागरी बँकांसाठी 15 जणांनी असे एकूण 87 (98.86टक्के) जणांनी मतदान केले. वाई मतदान केंद्रावर 132 मतदारांपैकी महिला व मागासवर्गीयासाठी 123 जणांनी तर नागरी बँकांसाठी 29 जणांनी असे एकूण 123(93.18टक्के) जणांनी मतदान केले. फलटण मतदान केंद्रावर 276 मतदारांपैकी महिला व मागासवर्गीयसाठी 264 जणांनी तर नागरी बँकांसाठी54 जणांनी असे एकूण 264(95.65टक्के) जणांनी मतदान केले. असे जिह्यात 1964 मतदारांपैकी सोसायटीसाठी 556 जणांनी, महिला व मागासवर्गीयसाठी 1892 जणांनी, नागरी बँकासाठी 360 जणांनी असे एकूण 1892(96.33टक्के) जणांनी मतदान केले. मतमोजणी दि. 23 रोजी 11 टेबलवर होणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER