Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

माझ्या पराभवासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजेच जबाबदार

आमदार शशिकांत शिंदे यांचा पत्रकार परिषदेत थेट हल्लाबोल
टीम : धैर्य टाईम्स
MLA ShivendraSinhaRaje is responsible for my defeat
मात्र हे माझ्या रक्तात नाही. पक्षाच्या चौकटीबाहेर जायचे नव्हते. भविष्यात पक्षवाढीसाठी मी काम करणार आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींनी जिल्ह्यातील आमदारांचे संख्याबळ का घटले? याचा विचार करावा, अशा शब्दात आ. शशिकांत शिंदे यांनी पराभवावर भाष्य केले.

सातारा : सातारा जिल्हा बँकेतील माझ्या पराभवासाठी आ. शिवेंद्रराजे भोसले हेच जबाबदार आहेत. माझ्या मतदारांना ऊस न नेण्याच्या त्यांनी धमक्या दिल्या. त्यांनीच गुंडगिरी, दडपशाहीच्या माध्यमातून निवडणूक केली. मतदारांना गोव्यापासून तिरूपती, म्हैसूर, उटी, विशाखापट्टणम, गणपतीपुळे या ठिकाणी नेले होते. त्या प्रत्येक ठिकाणी मी पोहोचलो होतो. मनात आणले असते तर सर्वच्या सर्व मतदार उचलून ताब्यात घेवून आलो असतो, असा खळबळजनक आरोप शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.
मात्र हे माझ्या रक्तात नाही. पक्षाच्या चौकटीबाहेर जायचे नव्हते. भविष्यात पक्षवाढीसाठी मी काम करणार आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींनी जिल्ह्यातील आमदारांचे संख्याबळ का घटले? याचा विचार करावा, अशा शब्दात आ. शशिकांत शिंदे यांनी पराभवावर भाष्य केले.
 मी राजा नसल्याने बिनविरोध होवू शकलो नाही. शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत बोलताना आ. शशिकांत शिंदे यांनी आ. शिवेंद्रराजे यांच्यावर थेट आरोप केले. मी राजा नसल्यामुळे बिनविरोध होवू शकलो नाही असे सांगून आ. शिंदे म्हणाले,  रांजणे व माझ्यामध्ये समेट घडवण्यासाठी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी सातत्याने बैठका घेण्याची आश्वासने दिली. मात्र, ही बैठक सुध्दा 10 ते 15 दिवस लांबवली. त्याचवेळी मला शंका आली होती.
मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत पॅनलचे प्रमुख आणि त्यांची आमची बैठक होवून प्रयत्न करायचे खोटे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे माझी फसगत झाली. मला पहिल्यावेळीच सांगितले असते की जमणार नाही, आम्ही  सहकार्य करणार नाही. मला माझ्या कार्यकर्त्याबरोबर रहावे लागेल असे अगोदरच सांगितले असते तर ते मला निश्चितपणाने पटले असते. त्यामुळेच मला पराभवाला सामोरे जावे लागले. परंतू चर्चेची द्वारे एका बाजूला चालू ठेवायची आणि दुसर्‍या बाजूला फूस लावायची, हे धोरण आ. शिवेंद्रराजेंनी अवलंबले. त्यामुळेच मला पराभवाला सामोरे जावे लागले.
पराभवानंतर पडद्याच्या मागे असणारे आ. शिवेंद्रराजे पुढे आले. अगदी नृत्यात सहभागी झाले. त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद बघितला तर या कटाचा सूत्रधार कोण? हे निश्चितपणे सर्वाना कळाले आहे. ते म्हणाले, जिल्हा बँक निवडणुकीत माझा गाफीलपणा नडला. खा. शरद पवार यांनीसुध्दा आ. शिंदे यांनी निवडणूक गांभीर्याने घेतली नसल्याचे वक्तव्य केले असून ही वस्तूस्थिती आहे. मी सरळमनाचा राजकारणी आहे. मनात एक आणि तोंडावर एक करण्याची भूमिका माझी कधीही नसते.
मतदान केंद्रावर सुध्दा मी हसत-खेळत निवडणूक केली. उलट माझ्यावरच गुंडगिरीचा आरोप केला. वास्तविक गुंडगिरी, दडपशाहीच्या माध्यमातून त्यांनीच निवडणूक केली. मतदार ज्या ज्या ठिकाणी नेले तेथे मी सर्वत्र पोहोचलो होतो. मनात आणले असते तर सर्वच्या सर्व मतदार उचलून ताब्यात घेवून आलो असतो, असेही आ. शिंदे म्हणाले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER