फलटण : पिंपरद हे गाव राजकीय दृष्ट्या अतिशय प्रगल्भ आहे. विकासात्मक दृष्टीने गावचा विकास होण्यासाठी पिंपरदचे मतदारांनी गावच्या विकासाला गती देण्यासाठी राजेगटाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले. ते पिंपरद ग्रामपंचायत निवडणूक 2022 च्या निम्मिताने पिंपरद येथेे राजे गट पुरस्कृत सिद्धेश्वर विकास पॅनलच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी श्रीराम सहकारी कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे, पिंपरद चे युवा नेतृत्व गट नेते श्री किरणभैय्या शिंदे पाटील, व यांच्यासह विविध मान्यवर, उमेदवार उपस्थित होते.
राजे गट पुरस्कृत सिद्धेश्वर विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत पिंपरद येथील जेष्ठ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उमेदवारांचा मतदारांना परिचय करून देण्यात आला