फलटण : वडजल ता.फलटण येथे पुणे पंढरपूर पालखी महामार्गालगत एका अज्ञात पुरुष जातीचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत मिळून आला असून घटना स्थळी फलटण ग्रामिण पोलिस चौकशी करत आहेत. महामार्गावर कुजलेल्या मृतदेहामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली असून मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसून फलटण ग्रामिण पोलिस पुढील चौकशी करीत आहेत.