सातारा प्रतिनिधी : २० जून २०२४
पंतप्रधान कार्यालयात सुरक्षा सल्लागारपदी कार्यरत असल्याची बतावणी करून लोकांना गंडा घालणारी साताऱ्यातील जोडी कश्मिरा पवार व गणेश गायकवाड या दोघांना आज सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात ८२ लाखांच्या फसवणूकप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. त्यांना सातारा येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुण्यातील बंड गार्डन परिसरातील एका बांधकाम व्यासायिकाने याबाबत तक्रार दिली होती. त्यानंतर सातारा पोलिसांनी कश्मिरा पवार व गणेश गायकवाड यांना अटक केली आहे. तब्बल ५० लाखांचा गंडा घालणारी ही जोडी अखेर पोलिसांच्या हाती लागली. शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी आज दुपारच्या सुमारास सदरबझार येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले. या जोडीने साताऱ्यातील एकाला विविध प्रकारच्या भूलथापा देऊन त्याची ८२ लाख रुपयांची फसवणूक केली होती. त्यांना सातारा येथील न्यायालयात हजर केले असता पुढील दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.