Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

अ‍ॅग्रीस्टॅक योजने अर्तंगत फार्मर आयडी तयार करणे पूर्णपणे मोफत ; पैशांची मागणी केली तर त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करा : जिल्हाधिकारी संतोष पाटील

फार्मर आयडीसाठी 25 ते 30 रुपये शुल्क घेऊन सदर नोंदणी करण्याचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांचे निर्देश - शेतकऱ्यांमध्ये संभ्रम
टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी - शेती क्षेत्राला प्रगत आणि शाश्वत बनविण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या अ‍ॅग्रीस्टॅक योजने अर्तंगत फार्मर आयडी तयार करून घ्यावा. शेतक-यांनी सीएससी सेंटर, महाऑनलाईन (सेतू) केंद्र या माध्यमातून मोफत नोंदणी करावी असे सांगतानाच फार्मर आयडी काढणे पूर्णपणे मोफत असून कोणी पैशांची मागणी केली तर त्यांच्या विरोधात माझ्याकडे तक्रार दाखल करा असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे. तर फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी 25 ते 30 रुपये शुल्क घेऊन सदर नोंदणी करण्याचे निर्देश दिले असल्याने फलटण तालुक्यात उलट - सुलट चर्चाना उधाण आले आहे एकंदरीतच फलटण तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकीकडे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्याचे आवाहन केले असून ते काढण्यासाठी मोफत ई महासेवा केंद्र, सीएससी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र सर्व ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. पण दुसरीकडे ई महासेवा केंद्र, सीएससी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र चालक शेतकऱ्यांचा गैरफायदा घेत 50 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत पैसे घेत आहेत. 

 सी. एस. सी. सेवा केंद्र यांनी कामासाठी दिलेला वेळ, त्यांची वापरली जाणारी साधनसामुग्री, त्यांचे वॉलेट मधून वजा होणारी रक्कम पाहता त्यांना वाजवी 25 ते 30 रुपये शुल्क घेऊन सदर नोंदणी करण्याचे निर्देश फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिले आहेत. प्रत्यक्षात 50 ते 300 रुपयांची आकारणी प्रति फार्मर आयडी तयार करून घेताना मागणी होऊ लागली असून मोफत योजनेतूनही शेतकऱ्यांची कोट्यवधीची आर्थिक लूट फलटण तालुक्यात होऊ लागली आहे. फलटण तालुक्यात जवळपास 2 लाख 47 हजाराहून अधिक शेतकरी आहेत. अ‍ॅग्रीस्टॅक योजने अर्तंगत फार्मर आयडी तयार करणे पूर्णपणे मोफत असून याबाबत कोणीही पैशांची मागणी केली तर त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करा असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

या आर्थिक लुटीला वेळीच आळा नाही बसला तर कोट्यवधीची लूट फलटण तालुक्यात होईल. त्यामुळे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांची लूट थांबवून सी. एस. सी. सेवा केंद्रावर कारवाई करण्याची मागणी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.योजनांच्या जीवावर दुकानदारी चालवणाऱ्या दलालांना जिल्हाधिकारी आवर घालणार का ? या दलालांवर कारवाई करणार का असाही सूर शेतकऱ्यांमधून उमटत आहे. शेतकऱ्यांमध्ये ही फार्मर आयडी कार्ड बाबत उत्सुकता आहे. त्यामुळे प्रशासन नेमकी भूमिका काय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 फार्मर आयडी तयार करून घेताना कोणी पैशांची मागणी केल्यास त्याच्या विरोधात माझ्याकडे तक्रार दाखल करा तात्काळ कारवाई करण्यात येईल - जिल्हाधिकारी संतोष पाटील


फार्मर आयडीसाठी 25 ते 30 रुपये शुल्क घेऊन सदर नोंदणी करण्याचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांचे निर्देश दिले आहेत. तर प्रत्यक्षात 50 ते 300 रुपयांची आर्थिक लूट फलटण तालुक्यात सुरु आहे. शेतकऱ्यांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.


 2 लाख 47 हजाराहून अधिक शेतकरी फलटण तालुक्यात असून 300 रुपयांची प्रत्येकी लूट सुरु असून कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक लूट जिल्हाधिकारी यांनी थांबवावी.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER