फलटण प्रतिनिधी -
फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक अगदी काही तासावर आली असतान दोन विद्यमान उमेदवारांमध्ये एका नामांकित हॉटेल मध्ये चांगलीच हाणामारी/धुलाई झाल्याची चर्चा फलटणमध्ये रंगली आहे.
दरम्यान एका उमेदवाराने विरोधी गटाच्या एका उमेदवाराबरोबर हात मिळवणे केल्याची घटना अगदी ताजी होती त्यातून सर्व घटनेची नेत्याने माहिती घेतली असता त्याने नक्कीच हात मिळवणे केली असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर तेव्हाही चांगलेच खडे बोल तथा प्रसाद मिळाला होता तरीही जित्याचीखोड .....शिवाय जात नाही आणि तीच घटना तोच स्वभाव अन आपलाच झाला पाहिजे विजय या हेतूने हेतू पुरस्सर एकच मत मागण्यामुळे समोरच्या उमेदवाराने पक्षाच्या प्रभारी देखत एका नामांकित हॉटेलमध्ये त्याची आज शुक्रवार दिनांक 19 रोजी चांगलीच धुलाई करत चटा चट चटा चट चापटी दिल्या यामुळे फलटण शहरात चांगलीच चर्चा या घटनेमुळे झाली आहे.












