फलटण प्रतिनिधी :
मौजे विडणी येथे घरात घुसून मारहाण करून किमती वस्तू घेऊन गेल्या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,मौजे विडणी गावच्या हद्दीत फिर्यादी राजेंद्र संपतराव शिर्के (रा. विडणी ता. फलटण जि. सातारा) यांचे जुने घर पाडत असताना प्रदीप शांतीलाल कासार, ज्योती प्रदीप कासार, रेखा धनंजय कासार,राजकिरण धनंजय कासार, राजेंद्र शंकरराव धुमाळ, मोनिका राजकिरण कासार (सर्व रा. विडणी ता. फलटण जि. सातारा) यांनी शिवीगाळ करत दमदाटी करत प्रदीप शांतीलाल कासार व राजेंद्र शंकरराव धुमाळ यांनी काठीने फिर्यादी यांच्या घरात घुसून मारहाण केली सदर मारहाणी मध्ये फिर्यादी यांच्या खिशामध्ये असलेले तीस हजार रुपये खाली पडली व फिर्यादी यांची भावजय सोनाली हिच्या गळ्यातील चार तोळ्याचा गंठण खाली पडला तो व रक्कम वरील आरोपी घेऊन गेले म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस हवालदार एस एस अडसूळ करत आहेत.