फलटण प्रतिनिधी - मौजे झडकबाईचीवाडी येथून गोठ्यातून ९५ हजार किंमतीची ३ वर्षाची गाय चोरुन नेहल्या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ रोजी रात्रौ ८:३० ते १०:३० दरम्यान मौजे झडकबाईचीवाडी तालुका फलटण गावचे हद्दीतील आवड नावाचे शिवारातील असलेल्या गोठ्यातून ९५ हजार किंमतीची पांढऱ्या रंगाची काळे टिपके व आखूड शिंगे असलेली अंदाजे ३ वर्षाची गाय फिर्यादी रेखा सोमनाथ शिंदे (रा. झडकबाईचीवाडी ता. फलटण जि. सातारा) यांच्या संमती शिवाय मुद्दाम लबाडीने विनोद निवृत्ती खरात, संतोष शामराव सोनटक्के (दोघे रा भांडवली ता. माण), सतीश रमेश माने (रा तोंडले ता. माण) यांनी चोरून नेली आहे अशी फिर्याद ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्यादी रेखा शिंदे यांनी दिली असून याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो. हवा. पिसे करत आहेत.