कृष्णानगर येथील पाटबंधारे विभागाची जागा सातारा येथे नव्याने होणार्या मेडिकल कॉलेजसाठी देण्यात आली आहे. या जागेत पाटबंधारे विभागाची कार्यालये, वसाहती तसेच इतर निवासी, अनिवासी इमारती आहेत. या इमारती पाडण्याचे काम शासनाच्यावतीने हाती घेण्यापूर्वीच चोरट्यांनी धुडगूस घालत इमारतींची तोडफोड केली सुरू केली आहे.
सातारा : कृष्णानगर येथील पाटबंधारे विभागाच्या इमारती पाडून त्यातील लोखंडी साहित्य चोरुन नेण्याचा सपाटा चोरट्यांनी लावला आहे. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात पाटबंधारे विभागाने तक्रार दिली असून अज्ञातांवर चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कृष्णानगर येथील पाटबंधारे विभागाची जागा सातारा येथे नव्याने होणार्या मेडिकल कॉलेजसाठी देण्यात आली आहे. या जागेत पाटबंधारे विभागाची कार्यालये, वसाहती तसेच इतर निवासी, अनिवासी इमारती आहेत. या इमारती पाडण्याचे काम शासनाच्यावतीने हाती घेण्यापूर्वीच चोरट्यांनी धुडगूस घालत इमारतींची तोडफोड केली सुरू केली आहे. याठिकाणी असणार्या पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांना दमदाटी करत चोरटे येथील लोखंडी साहित्य राजरोस चोरुन नेत आहेत. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात पाटबंधारे विभागाच्यावतीने गणेश सुरेश कणसे (रा. कृष्णानगर) यांनी तक्रार नोंदवली आहे. यात त्यांनी पाटबंधारेच्या कडा वसाहतीतील इमारतीची तोडफोड करत चोरट्यांनी 62 हजारांचे लोखंडी साहित्य चोरुन नेल्याचे नमुद केले आहे.