फलटण प्रतिनीधी:- श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली पाळखी सोहळ्यात पायी चालत पंढरपुर बाजुकडे पायी चालत जात असताना बरड येथे गंभीर जखमी झालेल्या वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाच्या विरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि.२२ जून रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास मौजे बरड ता. फलटण गावाच्या हद्दीत बरड गावचे कमानीचे समोरुन पुणे ते पंढरपुर जाणारे रस्त्याने सुरेश पंढरीनाथ मोरे (वय 66 वर्षे रा. संतनगर अरण्येश्वर आण्णा भाऊ साठे नगर झोपडपट्टी 54/2पुणे) हे श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली पाळखी सोहळ्यात पायी चालत पंढरपुर बाजुकडे पायी चालत जात असताना एका लाल रंगाच्या ट्रक ने सुरेश पंढरीनाथ मोरे यांना पाठीमागुन जोराची धडक देवुन त्यामध्ये त्यांना गंभीर जखमी झाले होते यानंतर सातारा सिव्हील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. उपचारादरम्यान दिनांक १ जुलै रोजी जखमी सुरेश पंढरीनाथ मोरे यांचे निधन झाले. याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाचे विरुद्ध फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास स.पो.नि रानगट करत असून मयत कागदपत्रे व फिर्यादी हजर झाल्यानंतर दिनांक १ सप्टेंबर रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.