Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात

फलटण नगरपालिकेत उद्या होणार ऐतिहासिक पदग्रहण सोहळा - 35 वर्षाच्या सत्ता परिवर्तन तर फलटणमध्ये उत्साहाची लाट

टीम : धैर्य टाईम्स

फलटण | प्रतिनिधी

फलटण नगरपालिकेच्या राजकारणात उद्या एक नवा आणि ऐतिहासिक अध्याय लिहिला जाणार आहे. तब्बल ३५ वर्षांनंतर झालेल्या राजकीय सत्ता परिवर्तनानंतर फलटणमध्ये परिवर्तनाची लाट उसळली असून, या पार्श्वभूमीवर भाजपाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर उद्या सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता अधिकृतपणे नगराध्यक्ष पदग्रहण करणार आहेत. 


सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी जनतेच्या विश्वासाच्या जोरावर हे सर्वोच्च नागरी पद पटकावले असून, त्यांचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या विजयाने केवळ सत्तांतरच नव्हे तर फलटणच्या राजकारणात नवी दिशा मिळाल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

उद्याच्या पदग्रहण सोहळ्यामुळे फलटण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरभरात आनंद, जल्लोष आणि अपेक्षांची लाट पाहायला मिळत असून, हा ऐतिहासिक क्षण छायाचित्रे आणि व्हिडिओंच्या माध्यमातून “फ्रेम”मध्ये कैद होणार आहे.

या पदग्रहण सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक तसेच प्रशासकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असल्याने कार्यक्रमाचे महत्त्व आणखी वाढले आहे. नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये मोठी उत्सुकता असून, फलटणच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात उद्यापासून होणार असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

फलटणकरांसाठी उद्याचा दिवस केवळ पदग्रहणाचा नसून, नव्या आशा, अपेक्षा आणि परिवर्तनाच्या स्वप्नांचा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.


फलटण नगरपालिकेच्या राजकारणात उद्या एक ऐतिहासिक क्षण साकारत असताना, या आनंदाच्या क्षणी एक भावनिक पोकळीही प्रकर्षाने जाणवणार आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर यांच्या पदग्रहण सोहळ्यावेळी त्यांचे वडील, माजी खासदार कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांची उणीव सर्वांनाच भासणार आहे.

फलटणच्या राजकारणात मोलाचे योगदान देणारे, दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे कै. हिंदुराव नाईक निंबाळकर हे जनतेच्या मनात आजही आदराने स्मरले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्ते घडले आणि सार्वजनिक जीवनात मूल्यांची परंपरा निर्माण झाली.

आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत समशेर सिंह नाईक निंबाळकर नगराध्यक्ष पदाची शपथ घेणार असले, तरी या ऐतिहासिक क्षणी वडिलांची छाया, त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद नसल्याची भावना अनेकांच्या मनात आहे. कार्यकर्ते, समर्थक आणि ज्येष्ठ नागरिकांकडून “आज हिंदुराव नाईक निंबाळकर असते तर…” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

हा पदग्रहण सोहळा जरी विजयाचा आणि परिवर्तनाचा असला, तरी त्यामागे कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या विचारांची आणि कार्याची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारीही समशेर सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर येऊन ठेपली आहे. फलटणच्या विकासाच्या या नव्या पर्वात त्यांच्या आठवणी कायम प्रेरणादायी ठरणार आहेत.

यावेळी मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, दिलीपसिंह भोसले माजी नगराध्यक्ष, शिवरूपराजे खर्डेकर तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ॲड. नरसिंह निकम अध्यक्ष फलटण तालुका संघर्ष समिती, सौ जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या, सौ प्रतिभाताई शिंदे तालुका अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपस्थित राहणार आहेत.

तरी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीतील सर्व घटक पक्ष, पदाधिकारी, सर्व नागरिक, व्यापारी, महिला व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER