Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप

स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची फलटण येथील चोरी उघड

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनीधी:- मार्च २०२३ मध्ये फलटण शहरातील लक्ष्मीनगर येथील प्रवीण प्रतापराव देशमुख (रा.फ्लॅट क्रमांक 1,रामटेक अपार्टमेंट,लक्ष्मीनगर, फलटण) यांच्या बंद घराचा दरवाजा फोडून अज्ञात चोरट्यानी सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली होती त्याप्रकरणातील आरोपीकडून ६६ तोळे सोन्याचे दागिणे जप्त करत १४ घरफोडी चोरी असे दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण १६ गुन्हे उघड करुन चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिण्यापैकी ३९ लाख ६० हजार रुपये किमतीचे ६६ तोळे सोन्याचे दागिणे व २५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिणे व ५० हजार ००० रुपये किमतीची मोटार सायकल असा एकूण ४० लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दि.३१/०८/२०२३ रोजी महेश उर्फ म्हावडया मंगेश काळे याचा कोरेगाव पोलीस ठाणे गु.र.नं.३०३/२०२३ भादविक ३९७, ३९५, ३९४, ४५७, ३८० या गुन्हयामध्ये सहभाग असून तो फलटण शहरात वावरत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तपास पथकाने नाना पाटील चौक फलटण परिसरात सापळा लावून आरोपी महेश उर्फ म्हावडया मंगेश काळे (वय २१ वर्षे रा. विसापूर ता. खटाव जि.सातारा) यास त्याचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याचेकडे कोरेगाव पोलीस ठाणे गु.र.नं.३०३/२०२३ भादविक ३१४, ४५७, ३८० या गुन्हयाचे अनुशंगाने विचारपूस केली असता सदरचा गुन्हा त्याने त्याचे साथिदार ऋतुराज भावज्या शिंदे (रा. खातगुन ता. खटाव जि.सातारा) कोहिनूर जाकिर काळे (रा. मोळ ता. खटाव जि.सातारा), वंदेक लक्ष्मण शिंदे, राजश्री वंदेक शिंदे (रा. विसापूर ता. खटाव जि.सातारा), अभय काळे रा. मोळ (ता. खटाव जि.सातारा), अतिक्रमण काळे (रा. खातगून ता. खटाव जि. सातारा) यांनी केला असल्याचे सांगीतल्याने महेश उर्फ म्हावडया मंगेश काळे याला गुन्हयात अटक करुन त्याची ६ दिवस पोलीस कोठडी घेतली व ऋतुराज भाज्या शिंदे याला ही गुन्हयात अटक करुन त्याची ५ दिवस पोलीस कोठडी घेण्यात आली होती. 

फलटण शहर सह कोरेगांव, औंध, वडुज, पुसेगाव, दहिवडी, म्हसवड, उंब्रज,सातारा शहर,कराड शहर या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे ७ आरोपींनी केला असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्याने गुन्हयास भा.द.वि.क.३९५, ३९७ ही वाढीव कलमे लावण्यात आली आहेत. पोलीस कोठडी कालावधीत अटक आरोपींच्याकडून नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ७७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे, चांदीचे दागिणे, गुन्हयात वापरलेले मोटार सायकल हस्तगत करण्यात आली तसेच आणखी १५ गुन्हयातील एकूण ६६ तोळे सोन्याचे दागिणे, चांदीचे दागिणे असा एकूण (चालू बाजार भावाप्रमाणे) ४० लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींच्याकडून दरोडा, जबरी चोरी, १४ घरफोडीचे गुन्हे असे एकूण १६ मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले.

नोव्हेंबर २०२२ पासून दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मोटार सायकलचोरी, इतर चोरी असे एकूण ६७ मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले असून नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यापैकी २३५ तोळे सोने (सब्बा दोन किलो) असा एकूण १ कोटी ८२ लाख ९६ हजार ८३० रुपये (एक कोटी व्याऐंशी लाख शहाण्णव हजार आठशे तीस रुपये) किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार तानाजी माने, सुधीर बनकर, विश्वनाथ संकपाळ, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, सचिन साळुंखे, अमोल माने, मुनीर मुल्ला, अजित कर्णे, सनी आवटे, अमृत कर्पे, पंकज बेसके, हसन तडवी, राकेश खांडके, राजू कांबळे, स्वप्नील माने, शिवाजी भिसे, मनोज जाधव, प्रविण कांबळे, स्वप्नील दौंड, केतन शिंदे, धीरज महाडीक, मोहसिन मोमीन, मयुर देशमुख, परशुराम वाघमारे, दलजित जगदाळे, दिपाली यादव, सौजन्या मोरे, शकुंतला सणस, आदिका वीर, अनुराधा सणस, मोनाली पवार, सायबर विभागाचे अमित झेंडे, अजय जाधव यांनी सदरची कारवाई केली आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER