मौजे भिलकटी ( फलटण ) येथे एका गोठ्यात गायी व लहान खोंडे दाटीवाटीने बेकायदेशीर डांबून ठेऊन त्यांना खाण्या-पिण्याची कोणताही सोय न करता गोठ्यात डांबून ठेवल्या प्रकरणी एकूण 4 लाख 59 हजार रुपये किंमतीचा मुद्देमला जप्त करण्यात आला असून याप्रकरणी तीन जणांच्या विरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 3 रोजी मौजे भिलकटी तालुका फलटण गावचे हद्दीत मोहम्मद शकीब कुरेशी बिलाल कुरेशी (पूर्ण नाव माहित नाही) (रा.फलटण, ता. फलटण) यांच्या मालकीच्या गोठ्यामध्ये 2 जर्सी जातीचे लहान खोंडे दाटीवाटीने बेकायदेशीर डांबून ठेऊन त्यांना खाण्या-पिण्याची कोणताही सोय न करता गोठ्यात डांबून ठेवली होती. यावेळी पोलिसांनी शेडमध्ये महिंद्रा कंपनीच्या गाडी क्रमांक MH46E0677 गाडीत एक पांढर्या रंगाची जर्सी गाय व एक काळे पांढर्या रंगाची गाय 1 जर्सी जातीचे लहान खोंड आढळून आली. सदर गाडी ड्रायव्हरला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अजित सोपान खोपडे ( वय 42 राहणार माहुर तालुका पुरंदर जिल्हा पुणे) असे सांगितले. यावेळी 4 लाख किंमतीची पिकअप गाडी क्रमांक एम एच 46 E 0677 तसेच 9 हजार रुपये 3 जर्सी गाईची वासरे वय अंदाजे एक दिवस ते 40 दिवस व 50 हजार रुपये किंमतीची एक पांढर्या राखाडी रंगाची जर्सी जर्सी गाई असा एकूण 4 लाख 59 हजार रुपये किंमतीचा मुद्देमला जप्त करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल दत्ताजीराव खराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहम्मद शकीब कुरेशी, बिलाल कुरेशी (पूर्ण नाव माहित नाही), अजित सोपान खोपडे यांच्या विरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.