Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण झाल्याशिवाय माघार नाही

कर्मचारी आंदोलनावर ठाम : कराडात कर्मचाऱ्यांनी अडविली एसटी वाहतूक,  जोरदार  घोषणाबाजी
टीम : धैर्य टाईम्स
The ST Corporation will not back down unless it is merged with the government
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी राज्यभर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. कराड बस स्थानकाबाहेर कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिला असून आगारातून दिवसभरात एकही बस सोडण्यात आलेली नाही.

कराड : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी राज्यभर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. कराड बस स्थानकाबाहेर कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिला असून आगारातून दिवसभरात एकही बस सोडण्यात आलेली नाही. तसेच जोपर्यंत आमची विलीनीकरणाची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
येथील बस स्थानकाबाहेर सोमवार दि. ८ रोजी कराड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. तसेच यावेळी बाहेरून कराड बस स्थानकावर आलेल्या एसटी बस अडवून कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, आंदोलनात सहभागी होत ठोस निर्णय होऊन संप मिटेपर्यंत कराड बस स्थानकावर एसटी बस न आणण्याच्या सूचनाही एसटी महामंडळाच्या आंदोलक कर्मचाऱ्यांनी संबंधित बस चालक, वाहकांना दिल्या. त्यानंतर बस स्थानकाच्या गेटवर थाबवलेल्या बस मार्गस्त करण्यात आल्या. यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
याप्रसंगी एसटी महामंडळाचे आंदोलक कर्मचारी आनंदा सावकार म्हणाले, राज्यभरात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपला विविध स्तरातून वाढता पाठींबा मिळत आहे. कराडमध्येही भारतीय जनता पक्ष, रयत क्रांती संघटना, जान फाऊन्डेशन यांच्यासह अनेक संघटना व लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी आंदोलनास जाहीर पाठींबा दिला आहे.
सध्या, एसटी सेवा बंद असल्याने प्रवासी, गोरगरीब जनतेला हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. एसटी सेवा एक तासजरी बंद असल्यास त्याचा किती ताण निर्माण होतो, हे प्रशासनाच्या लक्षात आले पहिले. या संपामुळे खाजगी वाहनधारकांनी प्रवास्यांची लुट सुरु केली असून त्यांच्याकडून अव्वाच्या- सव्वा पैसे घेतले जात आहेत. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे. राज्यभरात मुली, अपंग, जेष्ठ नागरिक यांच्यासह जवळपास ३०-३५ विविध सेवा गेल्या अनेक वर्षांपासून एसटी महामंडळ पुरवते. तरीही शासनाकडून त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले जात नसून त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. शासन महामंडळाचे विलीनीकरण का करून घेत नाही? हाच प्रश्न सर्व कर्मचाऱ्यांना पडला असून जोपर्यंत एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याची मागणी पूर्ण होत नाही. तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची माहितीही आनंदा सावकार यांनी यावेळी दिली.
दरम्यान, कराड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास भीम आर्मीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी भेट देऊन जाहीर पाठींबा दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे, दक्षिण तालुकाप्रमुख गजानन कुंभार, कराड शहप्रमुख जुनेद मोमिन, कार्याध्यक्ष गणेश सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती. तसेच जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनास जाहीर पाठींबा दर्शवला.

कामगारांवर दबाव टाकल्यास प्रत्युत्तर
जिल्ह्यात वेळोवेळी विविध कामगारांच्या प्रश्नांसाठी सह्याद्री श्रमिक कामगार महासंघाच्या वतीने लढा दिला आहे. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे आंदोलन यशस्वी होण्याच्या मार्गावर असल्याने काही अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. तसेच त्यांना कामावरून कमी करण्याबाबतच्या नोटीसीही बजावल्या जात आहेत. हे पूर्णपणे चुकीचे असून, असे झाल्यास योग्य निर्णय घेऊन प्रत्युत्तर देऊ. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास सह्याद्री श्रमिक कामगार महासंघ व पक्षाच्या वतीने जाहीर पाठींबा आहे.
 - एकनाथ बागडी राज्याध्यक्ष, सह्याद्री श्रमिक कामगार महासंघ

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना मजुरी करणाऱ्या मजूरापेक्षा कमी पगार व 700 ते 1500 रुपये पेन्शन दिली जाते. कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिवसरात्र काम केले. त्यामध्ये महामंडळाचे 309 कर्मचारी कोरोनाने मृत झाले. तसेच कमी व अनियमित पगारामुळे 36 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करुन आपले जीवन संपवले.  एवढी दयनीय अवस्था एसटी कर्मचाऱ्यांची असतानाही गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाकडे सरकार लक्ष देत नसून मागण्या मान्य करत नाही. त्यामुळे या सरकारचा जाहिर निषेध असून सरकारने तात्काळ एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात.
- सचिन नलवडे जिल्हाध्यक्ष, रयत क्रांती संघटना

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER