केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी नुकतीच आली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत विशेष वाढ करण्यात आली असतानाही फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कार्यक्रम स्थळापर्यंत नामदार गडकरी चक्क उघड्या जीपमधून जनतेच्या शुभेच्छा व आशीर्वाद स्वीकारत पोहोचत फलटणकरांना आश्चर्याचा धक्काच दिला.
फलटण तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघात कोट्यावधी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना. नितीन गडकरी यांचा भव्य नागरी सत्कार फलटण येथे शुक्रवार दि. २७ रोजी यशवंतराव चव्हाण हायस्कुलच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी विविध विकास कामांचे भूमिपूजन व शुभारंभ ना. गडकरींच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ना. नितीन गडकरी यांच्या स्वागताला हजारोंची गर्दी करीत या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य फलटणकरांना लाभले.
शेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक फलटण नगरीमध्ये नामदार नितीन गडकरी हे पहिल्यांदाच येत होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे फलटण येथे न भूतो न भविष्यती असे स्वागत करत माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणकरांना अभूतपूर्व सोहळ्याचे दर्शन घडविले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी नुकतीच आली होती त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत विशेष वाढ करण्यात आली असतानाही फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कार्यक्रम स्थळापर्यंत नामदार गडकरी चक्क उघड्या जीपमधून जनतेच्या शुभेच्छा व आशीर्वाद स्वीकारत पोहोचले.
फलटण येथील विमानतळावर नामदार गडकरी यांचे स्वागत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व खा. श्रीनिवास पाटिल यांनी केल्यानंतर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विनंतीस मान देऊन नामदार गडकरी यांनी उघड्या जीप मधून प्रवास करत फलटणकरांना आश्चर्याचा धक्का दिला.