Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे

महाबळेश्वर - पोलादपूर रस्त्याला अजून किती दिवस गोंजारणार?

पर्यटक, स्थानिक व्यावसायिक आणि प्रवाशांचा प्रशासनाला सवाल
टीम : धैर्य टाईम्स
How many more days will the Mahabaleshwar-Poladpur road be paved?
महाबळेश्वर-पोलादपूर रस्ता हा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. असे असतानाही या रस्त्याची डागडुजी व देखभाल-दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून अक्षम्य बेजबाबदारपणा केल्याचे दिसून येत आहे. परिणामी संबंधित अभियंत्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी येथील पर्यटक, स्थानिक व्यावसायिक आणि प्रवाशांमधून होत आहे.

सातारा : महाबळेश्वर-पोलादपूर रस्ता हा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. असे असतानाही या रस्त्याची डागडुजी व देखभाल-दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून अक्षम्य बेजबाबदारपणा केल्याचे दिसून येत आहे. परिणामी संबंधित अभियंत्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी येथील पर्यटक, स्थानिक व्यावसायिक आणि प्रवाशांमधून होत आहे.
राज्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणचे घाटरस्ते खचले, वाहून गेले. त्याच दरम्यान महाबळेश्‍वर-पोलादपूर हा राज्य महामार्ग क्र. 72 ही जवळपास वाहून गेला होता. त्यामुळे या रस्त्याची आपत्कालीन परिस्थितीत डागडुजी व देखभाल होणे गरजेचे होते. त्यास अनुसरुन आपत्कालीन निधीतून या रस्त्याचे काम करण्याचे योजले होते. त्यानुसार या रस्त्याचे काम एका ठेकेदारास देण्यात आले. मात्र ‘राजा बोले, दल हाले’ या उक्तीप्रमाणे सुरु असणार्‍या या कामावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांचे कोणत्याही प्रकारचे लक्ष नव्हते आणि नाही. या रस्त्याचे बांधकाम सुमारे तीन महिने उलटून गेले तरीही अजून कासवाच्या गतीनेच सुरु आहे. अभियंत्यांच्या या गलथानपणाचा फटका मात्र येथील पर्यटनावर होत आहे.
हा रस्ता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रास जोडणार्‍या प्रमुख मार्गांपैकी एक असून या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात महाबळेश्वर, प्रतापगड, महाड या ठिकाणी पर्यटक येत असतात. या रस्त्याचे सुरु असलेले काम अतिशय मंद गतीने व बेजाबदारपणे सुरु आहे. या महामार्गावर अनेक हॉटेल व्यासायिक तसेच पर्यटनावर अवलंबून असलेले अनेक उद्योग सुरु असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ लागली आहे. तरीही या रस्त्याचे ठेकेदार आणि अभियंत्यांचे कामाकडे दुर्लक्ष करीत येणार्‍या जाणार्‍या पर्यटक, प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळणे सुरु आहे. अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना झाल्यास त्यास संपूर्णतः सार्वजनिक बांधकाम खाते व संबंधित अभियंता जबाबदार असतील, अशी संतप्त प्रतिक्रिया येथील स्थानिक लोक देत आहे. बेजबाबदार आणि ढिसाळ कामाचे नियोजन याचे ज्वलंत उदाहरण म्हणून या रस्त्याकडे पहावे लागेल. 
तसे पाहता आपत्काल निधी चा वापर करून लवकरात लवकर हा महामार्ग दुरुस्त करणे अपेक्षित होते. परंतु सार्वजनिक बांधकाम  विभाग अतिशय नाकर्तेपणा तसेच उदासीनपणाने हे काम करत असताना दिसून येत आहे. दुरुस्ती काम करणार्‍या अभियंत्यांनी काही ठिकाणी एकमार्गी रस्ता बनवून याठिकाणी कामावर देखरेखीसाठी अभियंता आहेत कि नाही, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आज जवळपास 3 महिने उलटून वाहून गेलेल्या रस्त्याचे भाग तसेच दरडीसुद्धा दूर करण्यास ठेकेदारांना जमलेले नाही, कामाच्या या दिरंगाईबाबत पूर्णपणे सार्वजनिक बांधकाम खात्याचा अभियंता जबाबदार आहे, जे अशा स्वरूपाच्या काम करणार्‍या ठेकेदाराला पाठीशी घालत धीम्या गतीने काम करून घेत आहेत. अशा या अभियंत्यांना बडतर्फ करा, अशी मागणी येथील पर्यटक, स्थानिक व्यावसायिक आणि प्रवाशांमधून होत आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER