फलटण : हिंदू नववर्षाचा प्रारंभ मानल्या जाणाऱ्या गुढीपाडवा निमित्त फलटण शहरात भव्य स्वागत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी भक्त सेवा मंडळ सातारा जिल्ह्याच्या वतीने गुरुवार, दि. 19 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ही शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे.
ही मिरवणूक फलटण येथील नाना पाटील चौक येथून प्रारंभ होणार असून पारंपारिक वेशभूषेत मोठ्या संख्येने भक्तगण सहभागी होणार आहेत. शोभायात्रेत विविध सामाजिक व अध्यात्मिक संदेश देणारे आकर्षक देखावे सादर करण्यात येणार आहेत.
तसेच पारंपारिक वाद्यांच्या गजरात रामपंचायत, झेंडेधारी, स्त्री-पुरुष, तसेच भजनी मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग असणार आहे. रामानंद संप्रदायाच्या वतीने आयोजित या मिरवणुकीत धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण अनुभवायला मिळणार आहे.
मिरवणुकीचा मार्ग नाना पाटील चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – क्रांतिवीर उमाजी नाईक चौक – गजानन चौक – महात्मा फुले चौक – राम मंदिर मार्गे – पाचबत्ती चौक – सिमेंट रोड – शिवाजी चौक – क्रांतिसिंह नाना पाटील चौक असा असणार असून याच ठिकाणी शोभायात्रेची सांगता होणार आहे.
दरम्यान, रामानंद संप्रदायाच्या वतीने वर्षभरात विविध 41 सामाजिक व अध्यात्मिक उपक्रम राबविले जात असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. जाणाऱ्या गुढीपाडवा निमित्त फलटण शहरात भव्य स्वागत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.










