फलटण प्रतिनीधी :- मौजे वाठार निंबाळकर येथे दोन जण तलवार घेऊन वावरत असताना पोलिसांनी दोघांना अटक केली असून दोन जणांच्या विरोधात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे वाठार निंबाळकर ता ,फलटण जि, सातारा गावचे हद्दीत वाठार फाटा येथे दिनांक 06/02/2024 रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास संशयीत आरोपी 1)अजय संजय जाधव (वय 23 वर्षे, राहणार मलटण फलटण तालुका फलटण जिल्हा सातारा) 2) कुमार उर्फ गोट्या तानाजी जाधव (वय 26, राहणार चौधरीवाडी ता फलटण जिल्हा सातारा.) हे दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याकडील टाटा मॅजिक नंबर एम एच 11 एल 98 29 मध्ये फिरत असताना पोलिसांना त्यांच्यावर संशय आला असता कुमार उर्फ गोट्या तानाजी जाधव यांच्याजवळ एक तलवार आढळून आली. याप्रकरणी फिर्यादी पोलिस कॉन्स्टेबल नवनाथ सूर्यकांत कटलेवाड यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार अडसूळ करत आहेत.